एक्स्प्लोर
पुण्यात इसमाची मेहुण्याकडून हत्या, आरोपींना 3 तासात अटक
पुणे : बहिणीची बदनामी केल्याच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर तरुणाने दाजी म्हणजे बहिणीच्या नवऱ्याची हत्या केली आहे. पुण्यात संबंधित मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी अवघ्या तीन तासात आरोपींना बेड्या ठोकल्या.
पुण्यातील वडगाव भागातील तुकाईनगरमध्ये सोमवारी सकाळी 35 ते 40 वर्षे वयोगटातील एका इसमाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला. सिंहगड पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. डोक्यात दगड घालून ही हत्या झाल्याचं समोर आलं.
सिंहगड तपास पथकातील अधिकाऱ्यांनी मयत इसमाची ओळख पटवून तीन तासांच्या आत तीन आरोपींना अटक केली. मूळ बिहारच्या असलेल्या 35 वर्षीय अशोक रामबाबू सिंगची हत्या झाल्याचं समोर आलं.
बहिणीची बदनामी केल्याच्या कारणावरुन मयत आणि आरोपीचा वाद झाला. दारु पित असताना झालेल्या वादातून आरोपींनी अशोकची डोक्यात दगड घालून हत्या केली. त्याचा मृतदेह वडगावमधील कॅनॉलमध्ये फेकून दिला.
हत्येप्रकरणी 22 वर्षीय धीरज राम आशिष सिंग, 19 वर्षीय मिथुन बिगू सहा आणि रुपेश राम आशिष सिंह यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी बिहारला पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र अवघ्या तीन तासांत हत्येचा छडा लावून सिंहगड पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement