एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्याच्या तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी, लग्नास नकार मिळत असल्यानं नैराश्य
पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित पत्राची दखल घेतली आहे. या नैराश्यात सापडलेल्या तरुणाचे मन वळवण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे.
पुणे : लग्नास नकार मिळत असल्याने पुण्यातील एका तरुणाने इच्छामरण देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सदर तरुणाने इच्छामरणाची मागणी केली आहे. आई वडिलांची सेवा करणारी जोडीदार मिळत नसल्याने सदर तरुण निराश झाला आहे.
पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित पत्राची दखल घेतली आहे. या नैराश्यात सापडलेल्या तरुणाचे मन वळवण्यात दत्तवाडी पोलिसांना यश आले आहे.
हे पत्र मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी पुणे आयुक्तांना याबाबत कळविले. यानंतर लगेच स्थानिक दत्तवाडी पोलिसांनी या तरुणाशी संपर्क केला. पोलिसांनी त्या तरुणाचे समुपदेशन केले आहे.
काय लिहिले आहे पत्रात?
"मी माझ्या नाकर्तेपणामुळे आनंदाने इच्छा मरणाची मागणी करत आहे. मी आनंदाने मृत्यूला सामोरे जाण्यास तयार आहे. मी 37 वर्षाचा अविवाहित तरुण आहे. मी नोकरी करतो आणि माझे उत्पन्न मासिक 25000 रुपये आहे. माझी आई 73 वर्षांची असून वडील 81 वर्षांचे आहेत. माझी घरची परिस्थिती साधारण आहे. मला माझं स्वतःचं आस्तित्व बनवायचं आहे मात्र जगणे मला हे करण्यासाठी अपात्र ठरविले आहे. माझ्यामुळे कुणीही सुखी आणि समाधानी राहू शकत नाही, अगदी माझे आईवडील सुद्धा. आई वडिलांची सेवा करणारी जोडीदार मिळत नाही."
आणखी वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement