एक्स्प्लोर

पुण्यात भाजप आमदारांचं उपोषण सुटलं, सँडविच-वेफर्सवर ताव

पुण्यातील भाजप आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी सँडविच आणि वेफर्स खाऊन स्वपक्षाच्या उपोषणाला तिलांजली दिली.

पुणे : संसदेचं अधिवेशन वाया घालवल्याचा निषेध करण्यासाठी सत्ताधारी भाजपनं विरोधकांच्या विरोधात एकदिवसीय उपोषण करण्याचं ठरवलं. मात्र पुण्यात भाजपच्या दोन आमदारांनी अवघ्या अडीच तासात आपला 'उपास' सोडला. सँडविच आणि वेफर्स खाऊन भाजपच्या पुण्यातील दोन आमदारांनी उपोषणाला तिलांजली दिली. आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांनी आपल्याच पक्षाच्या उपोषणाला हरताळ फासला भेगडे आणि तापकीर सकाळी 11 वाजता एकदिवसीय उपोषणात सहभागी झाले. मात्र काही वेळातच ते काऊन्सिल हॉलला गेले. तिथे पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम आणि जलयुक्त शिवार योजनेसंबंधी बैठक होती. बैठक सुरु होताच नेहमीप्रमाणे नाश्त्याच्या प्लेट्स आल्या. मात्र स्वपक्षाच्या उपोषणाचा बहुतेक विसर पडल्याने भेकडे आणि तापकीर या दोन आमदारांनी सँडविच, वेफर्स आणि बर्फीवर ताव मारला. पाहा व्हिडिओ : काँग्रेसने केलेल्या सांकेतिक उपोषणावर भाजपने टीकेची झोड उठवली होती. छोले-भटुरे खाऊन काँग्रेस नेते उपोषणाला बसल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे स्वपक्षाच्या आमदारांनीही असंच उपोषण मोडल्यामुळे भाजप काय उत्त देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील आपल्या कार्यालयात, तर भाजपाध्यक्ष अमित शहा कर्नाटकातील हुबळीत उपोषणाला बसले. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत तर इतर राज्यातील भाजप नेतेही उपोषणाला बसले होते. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आत्मक्लेष उपोषण करण्यात येणार आहे. अधिवेशन वाया पाच मार्चला सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र चर्चेविनाच संपलं. यासाठी विरोधक आणि सरकारने एकमेकांकडे बोट दाखवलं. बँक घोटाळ्यावरुन काँग्रेसने पहिले पाच दिवस कामकाज होऊ दिलं नाही, तर त्यानंतर वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत, सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या व्यतिरिक्त काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीएमनेही कामकाज ठप्प केलं होतं.
संबंधित बातम्या :
शिवसेनेचा दुटप्पीपणा : ‘सामना’तून टीका, दिल्लीत गितेंचं उपोषण

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
पुण्यातील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूरच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग, कंटाळून होस्टेल सोडलं, 14 दिवसांपासून संपर्कच नाही!
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात मुसळधार! खडकवासलासह तीन धरणं भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Ujani Helicopter Fish : घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
घरातील फिशटँकमधील माशाने डोकेदुखी वाढवली, जैवविविधता, मच्छीमार अन्‌ धरणासाठी धोक्याची घंटा, उजनी परिसर टेन्शनमध्ये!
Khadakwasla Dam Water Discharge : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून आज 43,571 क्युसेक्सने विसर्ग; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
Washim Crime News : गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
गावातील तरूणावर जीव जडला; अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या पतीला शेतात बोलावलं; पत्नीने प्रियकराच्या मदतीने..., वाशिममधील घटना
Embed widget