Bhima Koregaon 1 January Preparation : 1 जानेवारीला भीमा कोरेगावला जायचंय? पुण्यातील 'या' स्थानकांवरुन धावणार जादा बसेस
भीमा कोरेगावसाठी पीएमपीएमएलकडूनही जादा बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला 370 अधिक बसेसचं नियोजन करण्यात आहे. त्यामुळे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींचा प्रवास सोपा होणार आहे.
Bhima Koregaon 1 January Preparation : भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी (Koregaon Bhima) रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमाची पुणे जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. त्यासाठी पीएमपीएमएलकडूनही जादा (pmpml) बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला 370 अधिक बसेसचं नियोजन करण्यात आहे. त्यामुळे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींचा प्रवास सोपा होणार आहे.
वाहनतळ आणि परिसरात फिरण्यासाठी 280 मोफत बस आणि पुण्यातून आठ स्थानकावरुन तिकीट असलेल्या 90 बस सोडल्या जाणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून यंदा चोख नियोजन करण्यात येत आहे. हा शौर्यदिन उत्साहात साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्याशिवाय पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक मूलभूत सुविधा द्या असे आदेश दिले आहेत.
वाहनतळ ते भीमा कोरेगाव परिसरात मोफत बस
कोरेगाव भीमा अंतर्गत परिसरात फिरण्यासाठी पीएमपीकडून 280 बसचं नियोजन केलं आहे. 31 डिसेंबरला सायंकाळी नऊ ते 1 जानेवारीला सकाळी सहा वाजेपर्यंत तुळापूर फाटा, लोणीकंद कुस्ती मैदान परिसरातून 140 बस सोडण्यात येणार आहेत. भीमा कोरेगावपर्यंत 115 बस आणि वडू फाटा ते वढूपर्यंत 25 बस अशा एकूण 280 मोफत बसचं नियोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी या सगळ्या बसचा खर्च बार्टीकडून दिला जातो. अनुयायांची सेवा करण्यासाठी हे पैसे दिले जातात. विजयस्तंभाला लाखो अनुयायी येत असतात. त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची उत्तम काळजी घेण्यासाठी अनेकांकडून मदत केली जाते. त्यात यंदा बार्टीकडून 63 लाख रुपयांचा चेक बससाठी देण्यात आला आहे.
कोणत्या परिसरातून धावणार बसेस?
पुणे स्टेशनवरुन 38 , मनपावरुन 35, दापोडी मंत्री निकेतन 2, ढोलेपाटील रोड मनपा शाळा 2, अप्पर डेपो बस स्थानक 4, पिंपरी आंबेडकर चौक 3, भोसरी स्थानक 4, हडपसर स्थानकावरुन 2 अशा बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये नियमित बस 55 असून, अतिरिक्त बस 35 सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.
राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लासची व्यवस्था करावी. अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार तयारीला सुरुवात झाली आहे. सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.