Baramati Apmc election : राष्ट्रवादी पुन्हा! बारामतीत राष्ट्रवादीची मुसंडी; 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी
Pune Apmc Election Result: मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे यावर्षीही राष्ट्रवादीने सत्ता कायम ठेवली आहे.
![Baramati Apmc election : राष्ट्रवादी पुन्हा! बारामतीत राष्ट्रवादीची मुसंडी; 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी Pune Baramati Apmc election NCP candidates won in 18 seats Baramati Apmc election : राष्ट्रवादी पुन्हा! बारामतीत राष्ट्रवादीची मुसंडी; 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/29/fd151a44b8fcabdad54e3096be713e5b168275624318289_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pune Apmc Election : पुण्यातील महत्वाची मानली जाणाऱ्या बारामती बाजार समितीचा निकाल (Pune Apmc Election Result) हाती आला आहे. बारामती बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने गड राखला आहे. मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे यावर्षीही राष्ट्रवादीने सत्ता कायम ठेवली आहे. एकूण 18 पैकी 18 जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत होती. त्यात संपूर्ण 18 पैकी 18 जागांवर राष्ट्रवादीने मुसंडी मारली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, मंचर, आंबेगाव, नीरा पुरंदर, खेड, तळेगाव दाभाडे आणि मावळ या बाजार समित्यांसाठी मतमोजणी पार पडत आहे. बारामतीत 17 जागांसाठी मतदान झालं होतं. तर इंदापूरमध्ये 14, दौंडमध्ये 18, तर नीरामध्ये 16 जागांसाठी हे मतदान झालं होतं. त्यात बारामतीत राष्ट्रवादीने मुसंडी मारत18 जागा काबीज केल्या आहेत.
विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गड राखला आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 97.37 टक्के मतदान पार पडलं होतं. 2628 मतदारांपैकी 2559 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत रयत पॅनलने 18 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक बिनविरोध झाल्याने त्यांचे सतरा उमेदवार रिंगणात होते. हे सगळे उमेदवार विजयी झाले आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)