एक्स्प्लोर

Pune Porsche Accident: विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड; पोर्शेच्या टीमकडून कारची पाहणी पूर्ण, काय लागलं हाती?

Pune Porsche Accident: अल्पवयीन धनिकपुत्राची रवानगी सध्या कोर्टानं बालसुधारगृहात केली आहे. तर ज्या गाडीनं भीषण अपघात झाला, ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सध्या महागड्या पोर्शे गाडीची तपासणी सुरू आहे.

Pune Accident Updates : पुणे : पुण्यात (Pune News) अल्पवयीन धनिकपुत्रानं दोन इंजिनिअर्सना आपल्या बापाच्या महागड्या कारनं (Porsche Car Accident) चिरडलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) केलेली कारवाई आणि धनिकपुत्राला मिळालेला जामीन यामुळे हे प्रकरण देशभरात भलतंच चर्चेत आहे. अशातच आता याप्रकरणी अनेक नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलानं महागड्या पोर्शे कारनं दोघांना चिरडलं. आता या धनिकपुत्रानं आपल्या बापाच्या ज्या महागड्या कारनं अपघात केला, त्याच कारच्या तपासणीतून अपघातासंदर्भातील काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येणार आहेत. यामुळे अपघातासंदर्भात आणखी काही गोष्टी प्रकाशझोतात येण्याची शक्यता आहे. 

अल्पवयीन धनिकपुत्राची रवानगी सध्या कोर्टानं बालसुधारगृहात केली आहे. तर ज्या गाडीनं भीषण अपघात झाला, ती गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सध्या महागड्या पोर्शे गाडीची तपासणी सुरू आहे. मुंबईहून एक पथक पुण्याला जाऊन या गाडीची तपासणी करत असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. स्पोर्ट्स कार असलेल्या पोर्शे गाडीत असलेल्या डॅश कॅममध्ये रेकॉर्ड झालेल्या काही क्लिप्सच्या मदतीनं अपघात नेमका कसा झाला? हे स्पष्ट होणार आहे. मुंबईहून आलेल्या पोर्शे कंपनीच्या एका पथकानं आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीनं सोमवारी गाडीची संपूर्ण पाहाणी केली. सर्व तपशील तपासून पाहिला. तसेच, गाडीतील इलेक्ट्रॉनिक डेटासह डॅश कॅम आणि गाडीच्या मागील बाजूस असलेल्या कॅमेऱ्यातील क्लिप्स ताब्यात घेतल्या आहेत. 

ड्रायवरला डांबून नेलेली 'ती' गाडी पोलिसांकडून जप्त 

अपघातावेळी लाडोबासोबत असणाऱ्या ड्रायव्हरला ज्या गाडीतून जबरदस्तीनं बसवून नेलं गेलं, ती घाडी पोलिसांनी जप्त केली आहे. ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणी धनिकपुत्राच्या आजोबांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मला गाडीत जबरदस्तीनं बसवून घेऊन गेले, असा आरोप गंगाराम यानं केला आहे. ड्रायव्हरनं सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल याच्या विरोधात या गाडीतून नेल्याचं आरोप केले होते. त्यामुळे पोलिसांनी ही गाडी जप्त केली असून या गाडीचाही कसून तपास पुणे पोलीस करणार असल्याचं समोर आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 9PM 14 March 2025ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 14 March 2025Satish Bhosale Family : अटकेनंतर सतीश भोसले उर्फ खोक्याच्या कुटुंबाची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
Embed widget