एक्स्प्लोर

Pune Accident: वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची; नवले पुलावरून जाताना कारची बसला धडक, दोघांचा जागीच मृत्यू तर 4 जण जखमी

Pune Accident: वाढदिवसाची पार्टीवरून परतत असलेल्या या कारमधील सहापैकी दोन तरूणांना जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर तरूणांना रूग्णालयात दाखल केलं आहे.

पुणे: पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात (Pune Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू आहे. स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला मागून धडक दिल्याने हा अपघात (Pune Accident)  झाला आहे. आज (शनिवारी, ता- 25) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात (Pune Accident) झाला आहे. 

वाढदिवसाची पार्टीवरून परतत असलेल्या या कारमधील सहापैकी दोन तरूणांना जागीच मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर तरूणांना अपघातानंतर आधी नवले हॉस्पिटल व नंतर पुढील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एक मोठी बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. पहाटे पाचच्या सुमारास एमएच 12 केडब्ल्यू 3663 ही स्विफ्ट कार नवले पुलावर भरधाव आली आणि या बसला मागून जोरात धडक दिली. कारचा वेग इतका होता की, कारचा पुढचा भागाचा चुराडा झाला आहे. या कारमधून प्रवास करणारे तरूण हे वाढदिवसाची पार्टी करून परतत होते. कारमधील सहा जणांपैकी दोन जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी झाले. तेथील नागरिकांनी आणि प्रवाशांनी उपचारांसाठी या चार जखमी युवकांना आधी नवले हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यानंतर पुढे त्यांना एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील नवले पूल हा मोठ्या प्रमाणावर रहदारी असणारा रस्ता आहे. यावरून दिवस रात्री वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघात होतात.

जखमींची नावे- 

सोहम खळे-वय 19
आयुष काटे- वय 20
अथर्व झेडगे-वय 19
प्रतीक बंडगर-वय 19
हर्ष वरे- वय 19

मुंबई गोवा हायवेवर अपघात

मुंबई गोवा हायवेवर रात्रीनंतर(शुक्रवारी, ता 24) आता पहाटे पुन्हा 5 वाजता सलग दुसरा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातात कार रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाली आहे. मुंबई वरुन खेड दिशेकडे जात असताना नागोठणे जवळील कामथ हॉटेल परिसरात हा अपघात घडला आहे. अपघातात चार जण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामासाठी टाकण्यात आलेल्या खडीवरून कार घसरल्याने हा अपघात झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. अपघातातील चार जखमींवर नागोठणे प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकारABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 25 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSpecial Report Mamta Kulkarni takes 'sanyaas' at Mahakumbh : ममता कुलकर्णीनं संन्यास का घेतला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Dhule Crime: धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
धुळ्यात सरपंचांच्या जोडीचा प्रताप, पेट्रोलपंपासाठी 2.5 लाखांच्या लाचेची मागणी, पण एसीबीच्या सापळ्यात अडकले
Mutual Fund SIP :शेअर बाजारात सातत्यानं घसरण, एसआयपी बंद करण्याचा गुंतवणूकदारांचा ट्रेंड, डिसेंबरमध्ये सर्व विक्रम मोडले 
अस्थिर बाजारानं गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग,विक्रमी संख्येनं एसआयपी खाती बंद, डिसेंबरमध्ये सर्व रेकॉर्ड मोडले
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
Embed widget