एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Accident : धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने फेकून दिले, दुसऱ्याच तरुणाचे ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बदलला, ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाश

 Pune Accident : धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात  फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितशे कुमार ( CP Amitesh Kumar) यांनी ही माहिती दिली आहे.

 Pune Accident :  पुणे अपघातासंदर्भात (Pune Porsche Accident News)  मोठी बातमी समोर येत आहे.  कल्याणीनगर अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल (Blood Sample)  बदलणाऱ्या  ससून रूग्णालयाच्या (Sasson Hospital)  दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आलीय. ब्लड सँपल बदलल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर असं त्यांचं नाव आहे. अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी त्या अल्पवयीन मुलाला आणलं असता सँपल बदलण्यात आलं. पुणे पोलिसांनी इतर लँबमध्ये या मुलाचं डीएनए टेस्टिंग केल्यावर बिंग फुटलं. एवढच नाही तर धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात  फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितशे कुमार ( CP Amitesh Kumar) यांनी ही माहिती दिली आहे.

 पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 304 मधील गुन्ह्यात आता 120 ब अंतर्गत, 460, 213, 214  हे कलम लावण्यात आले आहेत. 19 तारखेला जे अल्पवयीन तरुणाचे ब्लड सँपल आले ते दुसऱ्याचे बल्ड सँपल असल्याचे निष्पन्न झाले आहे. गाडी चालवत असलेल्या तरुणाचे ब्लड सँपल घेतले ते फेकून दिले.  दुसऱ्याचे ब्लड सँपल घेतले आणि त्या अल्पवयीन तरुणाचे नाव  वापरले.

ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाश

डॉ श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉ. श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले. ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सँपल घेतले आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. ससून हॉस्पिटलचे सगळे सीसीटिव्ही आम्ही तपासणार आहेत .

रक्ताचे नमुने बदलले

रक्ताचे नमुने  बदल्यामुळे पहिल्या रिपोर्टमध्ये अल्पवयीन मुलगा दारू प्यायला होता हे निष्पन्न झालेच नाही. विशाल अग्रवाल आणि तावरे याचे संपर्क झाल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या हॉस्पिटलमधून आलेल्या रिपोर्टमध्ये सुद्धा अल्पवयीन तरुण दारू प्यायला नव्हता हे निष्पन्न झाले आहे कारण रक्ताचे नमुने उशिरा गेले. 

डॉक्टरांचं बिंग कसं फुटले?

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला रविवारी वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना पैशांचे आमिष दाखविले. डॉ.अजय तावरे हे ससुन रुग्णालयाच्या forensic medicine and toxicology चे प्रमुख आहेत तर डॉक्टर श्रीहरी हरलोल हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. त्या मुलाचे ब्लड सँपल श्रीहरी हरलोल यांच्या विभागानं घेतले. मात्र त्यामध्ये दारूचा अंश येऊ शकतो हे लक्षात आल्यावर ते बदलायचे ठरवले. त्यासाठी रजेवर असलेल्या डॉक्टर अजय तावरे यांनी हस्तक्षेप केला. डॉक्टर अजय तावरे हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर आहेत. मात्र तरीही तावरे यांनी ब्लड स्यांपल बदलायला सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच एका रुग्णाचे ब्लड सॅंपल टेस्टिंग साठी देण्यात आले. मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबला पाठवून DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटलं.

हे ही वाचा : 

Pune Car Accident: फक्त ससूनमधील डॉक्टरच नव्हे, त्या रात्री अनेकांनी आपलं ईमान विकलंय, सगळं हळूहळू समोर येईल: रविंद्र धंगेकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : मंत्रिमंडळात यावेळी हमखास नंबर लागण्याचा गोगावलेंना विश्वासVijay Wadettiwar Full PC : महायुतीला  विरोधकच ठेवायचे नाही - विजय वडेट्टीवारSharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
मोठी बातमी : मतदानानंतरही EVM बॅटरी 99 टक्के कशी, निवडणूक आयोगाचं पहिल्यांदाच उत्तर
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Embed widget