Prakash Shendge : मराठा आमदार राजू नवघरेंना हरवणार, आता 156 आमदार राहिलेत, प्रकाश शेंडगेंनी मराठा आमदारांविरुद्ध रणशिंग फुंकलं
Prakash Shendge : इंदापुरात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात प्रकाश शेंडेगे यांनी मराठा आमदारांना इशारा दिला आहे.
बारामती : इंदापुरात (Indapur) ओबीसी एल्गार मेळाव्यात भाषण करताना प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी एका चिठ्ठीचं वाचन केलं. त्यावेळी वसमत विधानसभेचे मराठा आमदार राजू नवघेंना पाडल्याशिवाय राहणार नाही, तिसरी विकेट गेली असल्याचं म्हणत प्रकाश शेंडगेंनी मराठा आमदारांना थेट इशारा दिली. वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे (Raju Navghare) यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊन ओबीसी (OBC Reservation) विरुद्ध भूमिका घेतली. त्यामुळे त्यांना आता 100 टक्के पाडण्याचा निर्धार सर्व ओबीसी बांधवांनी घेतला असल्याचं प्रकाश शेंडगेंनी म्हटलं. ह्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही, असं आवाहन प्रकाश शेंडगेंनी ओबीसी समाजाला केलं.
बारातमतीमधील इंदापुरात ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्याला अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच छगन भुजबळ देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रकाश शेंडगे मराठा समाजावर हल्लाबोल केला.
आम्ही तुम्हाला सोडणार नाही - प्रकाश शेंडगे
सुप्रीम कोर्टाने सांगितलं की मराठा समाजाला आर्थिक मागास वर्गातून आंदोलन मिळणार नाही. तरीही त्यांना त्यामधून आरक्षण हवंय. त्यांना भोग भागायचे नाहीत. फक्त सर्टिफिकेट हवंय. असं सर्टिफिकेट आम्ही त्यांना मिळवू देणार नाही. भुजबळांनी आता आम्हाला सांगितलं आहे की सोमवारी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा ठराव प्रारित होणार आहे. विधानसभेच्या सर्व आमदारांना मी सांगू इच्छितो की जर तुम्ही विधानसभेत ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवला तर आम्ही एक-एक को चुन-चुनकर मारेंगे, तुम्हाला सोडणार नाही, असा थेट इशारा प्रकाश शेंडेंनी आमदारांना दिलाय.
तर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही - प्रकाश शेंडगे
जर या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा ठराव प्रारित झाला तर ओबीसी समाज स्वस्थ बसणार नसल्याचं प्रकाश शेंडगेंनी यावेळी म्हटलं. अनेक ठिकाणी ओबीसी समाज जास्त आहे दौंडमध्ये समजाचा आमदार कार्यक्रम करायचा का? असा सवाल यावेळी प्रकाश शेंडगेंनी विचारला. दोन आमदारांचा कार्यक्रम केलाय आता राहिलेल्या 156. अधिवेशनात एकही मराठा आमदार ओबीसी समाजावर बोलायला तयार नाही. लढाई रस्त्यावर लढायला लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 पाडू - प्रकाश शेंडगे
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. त्यामुळे भुजबळांना टार्गेट केलं जातंय. पण तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 पाडू. हे आता मी पश्चिम महाराष्ट्राकतच बोलतोय, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी बोलताना दिला.
हेही वाचा :
'सौ सुनार की एक लोहार...'; भुजबळांच्या सभेची सुरवातच जरांगेंवरील टीकेने; म्हणाले...