एक्स्प्लोर

आमदाराला चितपट करण्यासाठी भोसरीतल्या उमेदवाराने शेंडी वाढवली

पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेत सध्या 'शेंडीचं राजकारण' सुरु आहे.

पुणे : 'एक गाव भोसरी, दहा गाव दुसरी' अशी एक म्हण पुण्यात प्रसिद्ध आहे. या म्हणीला साजेसं राजकारण भोसरी गावात सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी विधानसभेत सध्या 'शेंडीचं राजकारण' सुरु आहे. भाजप संलग्न विद्यमान आमदाराला चितपट करण्यासाठी विधानसभेच्या एका इच्छुक उमेदवाराने शेंडी वाढवली आहे. या आमदारांचा पराभव करुनच वाढवलेली शेंडी कापणार असल्याची भीष्मप्रतिज्ञा या उमेदवाराने केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले हे उमेदवार म्हणजे महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने आहेत. विद्यमान आमदार महेश लांडगे यांचा पराभव करण्यासाठी त्यांनी दंड थोपटले आहेत. परंतु ज्यांना चारीमुंड्या चित करायचं आहे, त्या आमदार लांडगे यांनीदेखील शेंडी वाढवलेली आहे. म्हणूनच सध्या भोसरी विधानसभेत शेंडीच्या राजकारणाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये वाढवलेली शेंडी आणि एकमेकांना लावली जाणारी शेंडी या दोहोंचा भाग आहे. विद्यमान आमदार महेश लांडगे आणि विरोधी पक्षनेते दत्ता सानेंची पूर्वी घनिष्ठ मैत्री होती. परंतु मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विलास लांडे यांच्याविरोधात महेश लांडगे यांनी बंडखोरी केली. तेव्हा साने यांनी लांडगे यांचा प्रचार केला आणि त्यांना निवडून आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यावेळी लांडे यांचा पराभव करण्यासाठी साने आणि लांडगे या दोघांनीही शेंडी ठेवली होती. निवडणूक जिंकल्यानंतर वाढवलेली शेंडी कापली. परंतु आमदाराच्या खुर्चीवर बसताच लांडगे यांनी 'शेंडी' लावल्याचे साने खुलेआम म्हणू लागले. परिणामी साने आणि आमदार लांडगेंमध्ये चांगलंच विस्तव पेटलं. म्हणूनच या विधानसभेत लांडगेंना इंगा दाखवायचा सानेंनी चंग बांधला आहे. लांडगेंना पराभूत करण्यासाठी साने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तिकिटाची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु दुसरीकडे आमदार महेश लांडगे यांनीदेखील यावेळी शेंडी वाढवली आहे. लांडगे यांच्या शेंडी वाढवण्यामागचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. लांडगे यांनी वाढवलेली शेंडी आणि सानेंनी दिलेले आव्हान यावर तूर्तास तरी बोलणं टाळलं आहे. विधानसभा निवडणुकीला अद्याप तीन ते चार महिने बाकी आहेत. परंतु त्याआधीच शहरात शेंडीवरून राजकारण पेटलं आहे. दरम्यान कोणाची 'शेंडी' कोणावर भारी पडणार हे निकालातून स्पष्ट होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दीMumbai Rain:पावसाचा मंत्री आणि आमदारांना फटका; Amol Mitkari , Anil Patil थेट रेल्वे ट्रॅकवरुन निघालेMumbai Rain Updates : मुंबईतील अंधेरी सब वे ते नागरदास रोडला जोडणारा रस्ता पावसामुळे गेला वाहूनKurla Water will Accumulate :  कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मंत्र्यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ, अमोल मिटकरींचा व्हीडिओ व्हायरल
मुंबईतील मुसळधार पावसाने आपत्ती व्यवस्थापन-पुनवर्सन मंत्र्यांनाच 'रुळावर' आणलं, व्हीडिओ व्हायरल
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Embed widget