PMPML Bus pass Student : विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंताच मिटली; PMPML देणार मोफत पास, कसा आणि कुठे मिळणार पास?
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचा निर्णय घेतला आहे,
![PMPML Bus pass Student : विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंताच मिटली; PMPML देणार मोफत पास, कसा आणि कुठे मिळणार पास? PMPML to provide travel passes to PMC school students at zero cost PMPML Bus pass Student : विद्यार्थ्यांच्या प्रवासाची चिंताच मिटली; PMPML देणार मोफत पास, कसा आणि कुठे मिळणार पास?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/fbc576b145adb0d8b875677f12fac3261686483910276442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
PMPML Bus pass Student : काही दिवसातच शाळा सुरु होणार आहे. या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी गिफ्ट जाहीर केलं आहे. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता PMPML बस प्रवास मोफत करण्यात आला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचा निर्णय घेतला आहे, तर इयत्ता पाचवी ते दहावीच्या खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना बस भाड्याच्या 25 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी PMPML प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरील खासगी वाहनांचे प्रमाण कमी होण्यास आणि शाळांच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
PMPML अनेक मार्गांवर विद्यार्थ्यांसाठी विशेष सेवा देणारी बस चालवते. तरीही अनेक विद्यार्थी खासगी वाहने, रिक्षा किंवा खाजगीरित्या चालवल्या जाणाऱ्या व्हॅन आणि स्कूल बसचा वापर करून शाळेत ये-जा करतात. ही खाजगी वाहने शाळा उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळी रस्त्यावर उभी केली जातात. ज्यामुळे शाळा परिसरात आणि रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते.
कसा मिळेल मोफत पास...
-पास मिळाल्यानंतर PMPML बसने प्रवास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी PMPMLकडे अर्ज भरावे लागतील.
-सोमवारपासून सर्व PMPML बस डेपो आणि PMPML पास सेंटरवर फॉर्म उपलब्ध करून दिले जाणार आहेत. -भरलेले फॉर्म सर्व PMPML डेपोमध्ये स्वीकारले जातील.
-शाळांना संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांचे रिक्त फॉर्म गोळा करण्याची आणि भरलेले फॉर्म मोठ्या प्रमाणात PMPML बस डेपोमध्ये जमा करण्याची परवानगी असेल.
-औपचारिकता पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास करून बस डेपो किंवा पास सेंटरवर पोहोचावे लागणार नाही, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
-खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्मची छाननी केल्यानंतर आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यांना बस भाडे भरण्यासाठी द्यायच्या रकमेसाठी चलन दिले जाईल.
-त्यानंतर पीएमसीच्या हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेत पैसे भरावे लागतील.
-त्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे फॉर्म कागदपत्रांसह आणि चलनाची काउंटर कॉपी PMPML बस डेपो किंवा PMPML पास सेंटरमध्ये जमा करावी लागेल.
-या वर्षी शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना सुविधेचा लाभ घेता येईल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)