एक्स्प्लोर
'सेल्फी विथ खड्डा' काढणाऱ्यांना राष्ट्रवादीकडून शंभर रुपये
'सेल्फी विथ खड्डा' उपक्रमात सहभागी होणाऱ्या पिंपरीतील नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेसने शंभर रुपयांचं बक्षिस दिलं आहे.

पिंपरी चिंचवड : 'सेल्फी विथ खड्डा' उपक्रमात सहभागी होणाऱ्या पिंपरीतील नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेसने बक्षिस दिलं आहे. प्रत्येक फोटोमागे शंभर रुपये पारितोषिक देण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन आणि भाजपची पोलखोल करण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने हा उपक्रम राबवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेल्फी विथ खड्डा उपक्रमात तब्बल 500 फोटो आले. शहरात एकूण दोन हजार 379 खड्डे असून त्यापैकी दोन हजार 30 खड्डे बुजवल्याचा दावा प्रशासनाने केला होता. त्यामुळे शहरात फक्त 349 च खड्डे आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर राष्ट्रवादीने थेट नागरिकांकडूनच याचं उत्तर मागवण्याची शक्कल लढवली. "सेल्फी विथ खड्डा" उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन राष्ट्रवादीने केलं आणि सहभागींना प्रत्येकी शंभर रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. जवळपास पाचशे सेल्फी आल्यामुळे प्रशासन आणि भाजप तोंडघशी पडलं आहे. शंभर रुपयांचं असं बक्षीस घ्यावं लागणं ही दुर्दैवाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी आल्या.
आणखी वाचा























