आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत विनामास्क फोटो काढणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का?
पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधीनीं विनामास्क फोटो काढले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार का? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जातोय.
पिंपरी चिंचवड : शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी विनामास्क फोटो काढलाय. आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार का? असा प्रश्न सामान्यांकडून विचारला जातोय. पोलीस आयुक्तांना याबाबत विचारलं असता ते दालनात मास्क घालूनच आले होते. संवाद साधताना ही मास्क होताच, फक्त फोटो काढताना मास्क नव्हता. त्यामुळे कारवाई करणे चुकीचे राहील. शिवाय मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अद्याप पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाले नसल्याचं प्रकाश म्हणाले.
तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घडली चूक मान्य केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संज्योग वाघेरे, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पालिका ठेकेदार बिपीन नानेकरसह आणखी एकाने आज सदिच्छा भेट घेतली. तेव्हा हा फोटो काढण्यात आला. पोलीस आयुक्त प्रकाश यांच्याशी संवाद साधताना या सर्वांनी मास्क घातलेला होता. पण आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला तर नाहीच पण यावेळी मास्क काढण्याची चूक या चौघांकडून घडली. तेव्हा पोलीस आयुक्त प्रकाश यांनी मात्र मास्क घातलेलाच होता. पुणे जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. पुणे शहरात तर पोलिसांनी आठवड्यातच एक कोटींचा दंड वसूल केला. अशात राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना आणि ठेकेदारांना यातून सूट आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
फोटो काढणाऱ्यांवर कारवाई होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबत पुण्यात 5 सप्टेंबरला एक बैठक पार पडली. या बैठकीत मास्क न घालणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल करावा. असे आदेश देण्यात आले होते. या बैठकीला नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ही उपस्थित होते. पण तरी ही पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्या आदेशाचे पत्र दिलं नसल्याचं ते म्हणतायेत. त्यामुळे सध्या तरी पालिका तशी कारवाई करते. आम्ही पालिका आयुक्तांना आदेशाचे पत्र देण्यास सांगितले आहे, ते आज जरी प्राप्त झाले तरी उद्यापासून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू करू. असं पोलीस आयुक्त प्रकाश यांचं म्हणणं आहे.
Pune Lockdown Rumors | पुणे पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याचा मेसेज खोटा, महापौर मोहोळांकडून स्पष्ट