एक्स्प्लोर

Pimpri Chichwad Mahanagarpalika: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ट्विस्ट, एका रात्रीत प्रभागांचं आरक्षण पुन्हा बदललं, नेमकं काय घडलं?

Pimpri Chichwad Mahanagarpalika: पिंपरी महापालिकेच्या दोन प्रभागातील आरक्षणात अचानक बदल, यामागचं कारण समोर आली आहेत.

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chichwad Mahanagarpalika) निवडणुकीसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने दोन प्रभागातील चार जागांवरील आरक्षणात बदल केला आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षणात बदल झाला आहे. प्रभाग क्र.३० मधील ओबीसी जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे प्रभाग क्र.१९ मधील आबीसी जागेवरील महिला आरक्षण रद्द झाले. सर्वसाधारण जागेवरील प्रभाग क्र.३० मधील महिला आरक्षण रद्द झाले असून प्रभाग क्र.१९ मधील एक सर्वसाधारण जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे.(Pimpri Chichwad Mahanagarpalika) 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या सोडतीनंतर प्रभागातील आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाले.अऩुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षणांमुळे अनेक प्रभागात काही माजी नगरसेवक व इच्छुकांचा पत्ता कट झाला. तर, काही ठिकाणी उमेदवार बदलण्याची वेळ आली. मात्र, या आरक्षण सोडतीनंतर निवडणूक आयोगाने दुरुस्ती सूचवत दोन प्रभागातील आरक्षणात बदल केला. त्याचा चार जागांवर परिणाम झाला आहे.

आयोगाने केलेल्या दुरुस्तीनंतर प्रभाग क्र.३० मध्ये सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित झालेली क जागा आता महिलांसाठी राखीव झाली आहे. तर, याच प्रभागातील जागा ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होती. ती जागा सर्वसाधारण झाली आहे. तर, ओबीसी जागेवर एक जागा महिला आरक्षित झाली. त्यामुळे सोडतीत चिठ्ठी काढून सर्वात शेवटी प्रभाग क्र. १९ मधील ब जागा आबीसी महिलांसाठी राखीव झाली होती. त्या जागेवरील महिला आरक्षण रद्द झाले. तर प्रभाग ३० मधील ड जागेवरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करून प्रभाग क्र.१९ मधील क जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाली आहे.

दरम्यान, दोन प्रभागातील चार जागांवर झालेला हा बदल अनेक इच्छुकांसाठी परिणामकारक ठरणार आहे. परंतु, ही दुरुस्ती आणि आरक्षणातील बदल आरक्षण सोडतीतील नियमानुसार करण्यात आलेला आहे, असा दावा निवडणूक विभागाने केला आहे. तसेच, निश्चित केलेल्या आरक्षणाबाबत कोणतीही हरकत असल्यास ती नागरिकांना निवडणूक आयोगाकडे नोंदविता येणार असल्याचेही निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.

Pimpri Chichwad Mahanagarpalika: सोडत काढताना कुठे झाली चूक ?

ज्या प्रभागांमध्ये एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्हीकरीता राखीव असतील, परंतु, त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांकरीता राखीव नसतील, तर अशा प्रभागांतील ओबीसी प्रवर्गाची जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येईल, अशी नियमातील तरतूद आहे. ही तरतूद प्रभाग क्र.३० मध्ये वापरली न गेल्याने झालेली चूक आयागाने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.

आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने सोडतीत झालेली चूक दुरुस्त केली आहे. नियमानुसार योग्य पध्दतीने निश्चित झालेले आरक्षण प्रसिध्द करण्यात आले आहे.याबाबत नागरिकांना १७ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत निवडणूक विभागाकडे हरकत नोंदविता येणार आहे, असं पिंपरी चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांनी सांगितलं.

Pimpri Chichwad Mahanagarpalika: बदलानंतर दोन प्रभागातील आरक्षणाचे चित्र...

प्रभाग क्रमांक -१९ उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प

अ - अनुसूचित जाती - महिला
ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
क - सर्वसाधारण (महिला)
ड - सर्वसाधारण

प्रभाग क्रमांक - ३० दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी
अ - अनुसूचित जाती
ब -अनुसूचित जमाती - महिला
क - नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला
ड - सर्वसाधारण

महत्त्वाच्या बातम्या

Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
Embed widget