एक्स्प्लोर
पिंपरीत तरुणीला भररस्त्यात मिठी मारणारा रोडरोमियो ताब्यात
तरुणीला भररस्त्यात मिठी मारणाऱ्या आरोपीला आकुर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पिंपरी-चिंचवड : 29 वर्षीय तरुणीला एका सिव्हिल इंजिनिअरने भररस्त्यात मिठी मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी भागात ही घटना घडल्याची माहिती आहे. 29 वर्षीय तरुणी आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ऑफिसला चालली होती. बजाज कंपनी समोर मित्रांसोबत उभा असलेल्या सागर परमाने याने तरुणीला हातवारे केले. हे पाहून मित्राने त्याला टोकलं. सागर तरीही तरुणीच्या मागे गेला आणि त्याने तरुणीला तिच्या मनाविरुद्ध मिठी मारली. तरुणीने आरडाओरडा केल्याने काही जण जमा झाले. मित्रांनी सागरला माफी मागून प्रकरण मिटवायला सांगितलं, मात्र उलट त्याने पुन्हा तरुणीला मिठी मारली. तेव्हा जमावाने त्याला चांगलाच चोप दिला आणि निगडी पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सागरचे मानसिक संतुलन बिघडल्याचे पोलिसांनी सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट






















