Pune Bomb Threat: पुण्याचे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा फोन अफवा; पोलिसांची माहिती
Pune Bomb Threat: पुण्याचे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा फोन अफवा आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
Pune Bomb Threat: पुण्याचे रेल्वे स्थानक बॉम्बने (Bomb) उडवून देण्याचा (Pune) फोन अफवा आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Pune police) यांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच पुण्याचे रेल्वे स्थानक बॉम्बने उडून देण्याची माहिती समोर आली होती. या विषयी शहरात खळबळ उडाली होती. परंतु ही अफवा असल्याचे रेल्वे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी सांगितला आहे.
पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केली असता कोणतीही संशयित वस्तू आढळली नाही , असं पोलिसांचं म्हणणं होतं. हा फोन मनमाडमधून आल्याची माहिती समोर आली होती. फोन करणाऱ्या 32 वर्षीय गोविंद भगवान मांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो काल रात्री मनमाड ते पुणे असा प्रवास करत असताना त्याच्या बोगीमध्ये पोलिसांसारखे दिसणाऱ्या दोघांनी त्याच्यासोबत विविध कारणांवरुन भांडण केलं. आम्हाला दहशतवादी हल्ल्यांचे काम करायचे असते, असं दोन व्यक्तींनी भांडणात सांगितलं. मात्र फोन सुरु असल्याने तशीच माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. संपूर्ण चौकशी केली असता. हा फोन गैरसमजातून आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.