एक्स्प्लोर

Parth Pawar Pune Land Scam Sheetal Tejwani: पार्थ पवार प्रकरणातील शीतल तेजवानीच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

Parth Pawar Pune Land Scam Sheetal Tejwani: पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवानीच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्हं दिसून येत आहे.

Parth Pawar Pune Land Scam Sheetal Tejwani: पार्थ पवार (Parth Pawar) आणि दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्या मालकीच्या 'अमेडिया कंपनी'मार्फत करण्यात आलेल्या तब्बल 40 एकर जमीन व्यवहार प्रकरणात नवे वळण आले आहे. या प्रकरणात महत्त्वाची आरोपी असलेल्या शीतल किसनचंद तेजवानीच्या (Sheetal Tejwani) अडचणी आता वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

पुणे पोलिसांनी (Pune Police) इमिग्रेशन विभागाकडून शीतल तेजवानीची माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे. बावधन पोलीस ठाण्याद्वारे ही माहिती मागवली जाणार असून, शीतल तेजवानीने देशाबाहेर प्रवास केला आहे का, याची खातरजमा केली जाणार आहे. शीतल तेजवानी ही सध्या फरार असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे आणि राहत्या पत्त्यावर ती आढळली नाही. त्यामुळे ती पतीसह देशाबाहेर पळाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Parth Pawar Pune Land Scam: बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास  आर्थिक गुन्हे शाखेकडे

दरम्यान, बोपोडी येथील कृषी विभागाच्या जमिनीवर मालकीहक्क दाखवून शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) वर्ग करण्यात आला आहे. या संदर्भात शासकीय कागदपत्रे संबंधित विभागांकडून मागविण्यात आली असून, त्यांची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात नायब तहसीलदार प्रविणा बोर्डे यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीनुसार, तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गावंडे, राजेंद्र रामचंद्र विध्वंस, ह्रषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’चे संचालक दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parth Pawar Pune Land Scam: राजकीय पातळीवर खळबळ

या प्रकरणाचा धागा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीशी जोडला गेल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीमार्फत करण्यात आलेल्या कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन व्यवहारात गंभीर गैरव्यवहार व शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Parth Pawar Pune Land Scam Sheetal Tejwani: शीतल तेजवानीवर दोन गुन्हे, मोठं कर्ज प्रकरणही उघड

शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. तिच्या पतीवर 42 कोटींचे, तर तिच्या कंपनीवर सहा कोटी रुपयांचे कर्ज असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात ती एक मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) असल्याचा संशय अधिक बळावला आहे.

कोण आहे शीतल तेजवानी?, वादग्रस्त इतिहास काय? (Who Is Sheetal Tejawani)

1.शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती-पत्नी आहेत. 

2. सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली 10 कर्जे

3. 41 कोटी रुपयांची 10 कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे

4. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून उचलले कर्ज

5. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात वापरली

6. 2019 ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड

7. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही

8. 31 मार्च 2021 पर्यंत कर्जांची रक्कम 60 कोटीच्या घरात

9. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा

10. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त, मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला

11. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर 2021मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक

12. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून 2023मध्ये ईडीकडून अटक

आणखी वाचा 

Ajit Pawar & Parth Pawar: शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो, यापुढे पार्थ काळजी घेईल; अजित पवारांकडून मुलाची पाठराखण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Chandrashekhar Bawankule On Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंचे मतभेद असले तरी फडणीसांवर नाराजी नाही - बावनकुळे
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
Chhatrapati Sambhajinagar : एकाच वेळी 3-4 मतं कशी द्यायची? प्रभागनिहाय मतदानचा EXCLUSIVE DEMO
Praniti Shinde Solapur Speech : बाळासाहेब प्रकरणावर भाष्य, भाजपवर टीका;प्रणिती शिंदेंचं जबरदस्त भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
भाजपचा गमछा गळ्यात घालताच संतोष धुरींची आगपाखड, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवता, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? ठाकरे गटाचा अमित साटमांवर हल्लाबोल
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
उमेदवारांना पैसे वाटताना मला कोणी भेटलं तर तिथेच बदडून काढणार; खैरेंचा इशारा, बावनकुळेंवरही टीका
Nashik Crime News: साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
साधूवेशातील दोघांकडून अल्पवयीन मुलीचा पाठलाग, हात पकडून गैरकृत्य; मैत्रिणीने धाडस दाखवत आरडाओरडा केला अन्...
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक, दोन दिवसांत 215 लोकलच्या फेऱ्या रद्द, नेमका काय परिणाम होणार?
Nashik Crime News : दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
दारूच्या व्यसनातून उफाळला वाद, साखरझोपेत असलेल्या वडिलांना मुलानेच संपवलं; नाशिक हादरलं!
Latur Municipal Election 2026: भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
भांडी विक्री करून उदरनिर्वाह ते सात वर्षांची समाजसेवा, अजितदादांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीत 'हिरा' शोधला; सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी
Embed widget