एक्स्प्लोर
संस्थाचालकाच्या मुलीकडून शिक्षकाला चपलेचा प्रसाद
पुणे: विद्या विलास मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या संचालकाच्या मुलीने एका गेस्ट लेक्चररला चक्क चपलेचा प्रसाद दिला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या वादामधून हा प्रकार घडला असल्याचे समजते. गणेश पाटील असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव असून संस्थाचालक अंथनी ननावरे यांच्या मुलीने त्यांना मारहाण केली.
संस्थेची विश्रांतवाडीमध्ये जनता हायस्कूल नावाची शाळा आहे. या शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुख्याध्यापिकांनी पाटील यांना गेस्ट लेक्चरसाठी नेमले होते.
पाटील लेक्चरसाठी शाळेमध्ये आले असता अंथनी ननावरे आणि त्यांच्या मुलीने त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. राग अनावर झालेल्या मुलीने पाटील यांना थेट चपलेने मारहाण करायला सुरुवात केल्याने शाळेत गोंधळ उडाला.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत मुलीच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement