Pune Monsoon Orange Alert: पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी, घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात 5 जुलै ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Pune Monsoon Orange Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आज (5 जुलै) ते 9 जुलै या कालावधीत मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी एकाकी अत्यंत मुसळधार पावसासह जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे, पुणे आयएमडीने ट्विट करत दिली आहे. कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात असाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या दोन तुकड्याही कोल्हापुरात तैनात आहेत.
पुणे शहरात आजपासून पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. सोमवार 4 जूनला शहरातील अनेक परिसरात पावसाने हजेरी लावली होती. पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने शहरात ढगाळ वातावरण आहे. पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबई- आणि कोकण भागात पावसाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे पुण्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
7 जुलैपर्यंत पुणे शहर आणि परिसरात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जारी केला आहे. IMD च्या मते 6 जुलैपासून पुढील काही दिवसांपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवार (6 जुलै) पासून, कमकुवत मान्सूनच्या स्थितीमुळे महाराष्ट्रात विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 5 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमी होईल. पुन्हा 6 जुलैपासून काही दिवस मान्सून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता आहे, हवामान आणि वायु प्रदूषण मॉनिटरिंग युनिट, भारतीय हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पसरलेल्या पावसाची शक्यता. 🌧🌧
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 5, 2022
📢 कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागात अती मुसळधार पावसाचे इशारे.
🌊🌊कोकणात पूर परिस्थिती अनेक ठिकाणी... https://t.co/kxlIAKcXa7
कोकणासह विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील सांगण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात 6 आणि 7 जुलै रोजी मुसळधारेचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यात देखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकणाला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
