एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे पालिकेच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमांचा फज्जा, विरोधकांचं ढोल वाजवून आंदोलन
गणेशोत्सव काळात पुणे पालिकेनं आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा फज्जा उडाल्यानंतर विरोधकांनी आज पालिकेविरोधात ढोल वाजवून आंदोलन केलं.
पुणे : गणेशोत्सव काळात पुणे पालिकेनं आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा फज्जा उडाल्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी आज पालिकेविरोधात ढोल वाजवून आंदोलन केलं.
यंदा पुणे महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
या निमित्तं एकाचवेळी 5 हजार ढोल ताशांचं वादन करुन, त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे करण्यात येणार होतं. ढोलवादनाचा कार्यक्रम यापूर्वी 24 ऑगस्टला पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मात्र तो रद्द करून रविवारी 27 ऑगस्टला संध्याकाळी हा कार्यक्रम म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुलात हॊईल असं जाहीर करण्यात आलं.
पण हा कार्यक्रम दुसऱ्यांदा रद्द करावा लागला. शिवाय 20 ऑगस्टला एक हजार बाईकस्वारांच्या बाईक रॅलीचा आयोजन करण्यात आलं होत . मात्र त्या रॅलीला शंभर लोकही हजार नव्हते. यामुळे पालिकेतील विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत ढोल वाजवून अनोखा आंदोलन केले.
दरम्यान, या सर्व कार्यक्रमांसाठी महापालिकेने 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती. याला महापालिकेतील विरोधीपक्षांनी आज विरोध केला. मात्र सर्व आरोप स्थायी समिती अध्यक्षांनी फेटाळून लावले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement