एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोंदणी पद्धतीनं विवाह करताना आता ऑनलाईन नोटीस शक्य
विवाह नोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्यानं सोईच्या ठिकाणाहून संबंधित व्यक्तीला नोंदणीसाठी नोटीस देता येणार आहे.
पुणे : नोंदणी पद्धतीनं विवाह करु इच्छिणाऱ्या वधू-वरांचा वेळ आता वाचणार आहे. विवाह नोंदणी कार्यालयात जाण्याऐवजी आता ऑनलाईनच्या माध्यमातून नोटीस देता येणार आहे.
लग्नाच्या नोंदणीसाठी विवाह नोंदणी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती राज्याचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली. विवाह नोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाईन केल्यानं सोईच्या ठिकाणाहून संबंधित व्यक्तीला नोंदणीसाठी नोटीस देता येणार आहे.
पूर्वी वधू-वरांना नोटीस देणे आणि 30 दिवसानंतर विवाह संपन्न करणे अशा कामासाठी वेळ जात होता. आता प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून ऑनलाईन केल्याने संबंधित जोडप्याचा आणि अधिकाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement