दंगली घडविणाऱ्या प्रवृत्तींमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती, शरद पवारांचा गंभीर आरोप
Sharad Pawar on manipur violence: राजकीयांनी संघटित राहायला हवं. कारण सध्या धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण केला जात आहे.
Sharad Pawar : राजकीयांनी संघटित राहायला हवं. कारण सध्या धर्म, जातीच्या नावाने समाजात संघर्ष निर्माण केला जात आहे. या प्रवृत्तीमागे सत्ताधाऱ्यांची शक्ती आहे. या गोष्टी देशाच्या बाबतीत गंभीर आहेत. गेल्या काही दिवसांत किती जातीय दंगली होतायेत. हा देश, हा समाज सर्वांना घेऊन जाणारा आहे. मात्र सध्या दहशतीचे वातावरण निर्माण केली जातीये. ही कामाची पद्धत सध्या दिसून येतंय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केली. ते लोणावळ्यात बोलत होते.
आपल्याला चीन बाबत चिंता असते. मात्र त्या चीनमध्ये आपल्या भारतातील एका डॉक्टरचे नाव घेतले जाते. त्या डॉक्टरांनी महायुद्धाच्या वेळी चीनमध्ये सेवा दिली होती. म्हणून त्या डॉक्टरांच्या नावाने चीनमध्ये सेवा आश्रम उभारण्यात आलेलं आहे, असे शरद पवार म्हणाले. डॉक्टरांनी जागरूक राहायला हवं. आता देशातील चित्र बदलत आहे. कर्नाटक मध्ये तुम्ही पाहिलेलं आहेच. कोणी काहीही सांगत असलं तरी आता बदलतंय. त्यांच्यामागे मोठी शक्ती आहे. मात्र तामिळनाडू, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा 70 टक्के ठिकाणी भाजप सत्तेबाहेर आहे. गोवा, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मध्ये वेगळं चित्र आहे. इथं कसली तरी खोकी देऊन फोडाफोडी केली. मात्र आता देशाचा कारभार कोणी चालवावा याबाबत निर्णय घेताना प्रादेशिक पक्षच हे ठरवतील, यात कोणती शंका नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली. त्या आधी आणि नंतर काय घडलं. ते आपल्या देशातील शहाण्या जनतेने घडवलं. आत्ताही आपल्याला या जनतेपर्यंत हे सगळं पोहचवले की बदल निश्चित आहे. त्यामुळं डॉक्टरांनी इंजेक्शन देताना कानात सांगा, त्यांनी कोणत्या बाजूनं मतदान करायला हवं. हे कार्य केलं तर सत्तांतर नक्की आहे, असे शरद पवार म्हणाले.
मणिपूरमधील नागरिक म्हणतात आम्ही भारतीय आहोत का?
आजचा काळ चमत्कारिक आहे. मला आज माणिपूरच्या सहकऱ्याचा फोन आला. ते म्हणाले आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही? यावर मी म्हटलं असं टोकाचे का बोलताय. ते म्हणाले इथं लोक, अधिकारी, शैक्षणिक संस्थांवर हल्ले होतायेत. हे राज्य पेटलंय पण इथं कोणी लक्ष देत नाहीत. रोज घरं दारं उद्धवस्थ होतायेत. केंद्र सरकार याकडे लक्ष ही देईना. पंतप्रधान असो की केंद्रीय मंत्री असोत आमच्या प्रश्नांकडे डोंकून ही पाहत नाहीत. त्यामुळं आम्ही भारताचे नागरिक आहोत की नाही अशी भीती ते व्यक्त करतायेत. ही परिस्थिती हाताबाहेर गेली अन सीमेवरील देशांना याबाबत कुणकुण लागली आणि त्यांनी या लोकांशी संवाद साधला तर हे लोक त्या देशात जायची भीती निर्माण होईल, असे शरद पवार म्हणाले.
मणिपूरबाबत निवृत्त लष्कर अधिकारी म्हणतात आम्ही भारतीय आहोत ना?
देशाच्या दृष्टीने हे चित्र वाईट असल्याचं निवृत्त लष्करी अधिकारी सांगतायत. ही स्थिती असताना राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करतात, हे खेदजनक आहे. नॉर्थ ईस्ट आणि काश्मिरी यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं. एकबाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. त्यामुळं इथल्या नागरिकांशी संवाद साधून तिथं शांतता राखायची असते. मी केंद्रीय संरक्षण मंत्री असताना हे करायचो, त्यामुळं याकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही. 24 जूनला आम्ही सगळे भेटणार आहोत. अनेक राज्याचे मुख्यमंत्री ही तेव्हा असतील. त्यावेळी चर्चा करू, याच विषयाला प्राधान्य राहील, असे पवार म्हणाले.