एक्स्प्लोर

रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक, प्रोफाईल फोटोला सिया राजपूत नाव

Rohit Pawar Facebook Account Hack : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झालेय.

Rohit Pawar Facebook Account Hack : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं फेसबुक अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झालेय. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव दाखवत आहे. तर फेसबुकला सिया राजपूत असं नाव दाखवत आहे. 

रोहित पवार सोशल मीडियावर चांगले अॅक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात. मागील काही दिवसांपासून त्यांची सोशल मीडिया खाती हॅक होत असल्याचे समोर आलेय. रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबत संताप व्यक्त केलाय.  त्याशिवाय रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असे रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. दरम्यान, रोहित पवार यांना फेसबुक पेजवर पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत  फेसबुक पेज हॅक झालं आहे. या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं, असे ट्वीट करत रोहित पवार यांनी समर्थकांना मेसेज दिलाय. दरम्यान, नेमके हे पेज कुठून आणि कोणी हॅक्क केले याचा मात्र सुगावा अजून लागलेला नाही. पण रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे. 

रोहित पवार यांच्या फेसबुक पेजचं युरआरएलही बदलण्यात आल्याचे दिसतेय. युआरएलमध्ये https://www.facebook.com/SiyaRajput.Real असे नाव दिसत आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन सिया रजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहिरात करण्यात आल्याचे दिसतेय. रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवरुन लागोपाठ तीन ते चार पोस्ट केल्याचे दिसतेय. त्यामध्ये सिया राजपूत कपड्याच्या ब्रँडची जाहीरात असल्याचे दिसतेय. रोहित पवार यांचं पेज नेमके कुठून आणि कुणी हॅक्क केले याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

 

रोहित पवार यांच्या फेसबुकवर खालील मेसेज दाखवला जातेय. त्यामध्ये रोहित पवार यांच्या फेसबुक पेजवर सिया राजपूत असे नाव दिसतेय. त्याशिवाय एक मेसेजही पोस्ट करण्यात आलाय.

 

रोहित पवार यांच्या समर्थकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवार यांच्या समर्थकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. 


रोहित पवारांचं फेसबुक अकाऊंट हॅक, प्रोफाईल फोटोला सिया राजपूत नाव

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Someshwar Karkhana Election : दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime: देवीच्या दर्शनाला गेल्या, रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
देवीच्या दर्शनानंतर रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Embed widget