एक्स्प्लोर

काय भिकारड्यासारखं बोलतो, असं म्हटलं तर कसं वाटेल? अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल

Ajit Pawar On Chandrakant Patil: आम्ही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. भीक मागून शाळा बांधल्या असं सांगितले. कुणी सांगितले यांना भीक मागून केलं म्हणून?

Ajit Pawar On Chandrakant Patil: कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वादंग निर्माण झालेय. विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलेय, राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. अजित पवार म्हणाले की, 'आपले पालकमंत्री चंद्रकांत पाटील काय म्हणाले. महापुरुषांचा सारखं आपमान करतात. आम्ही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. भीक मागून शाळा बांधल्या असं सांगितले. कुणी सांगितले यांना भीक मागून केलं म्हणून? आम्ही म्हणालो काय भिकारड्यासारखं बोलतो तर काय वाटेल तुम्हाला? आम्ही तसं बोलणार नाही. आरे ला कारे आम्हाला खूप चांगलं करता येतं. पण आम्ही ते करणार नाही. आमची ती संस्कृती नाही. यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. कोण भिकेला लागतंय हे दाखवायची वेळ आली आहे.' इंदापूर येथील कृषी मोहोत्सव कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. 

यांचे मंत्री वाचळवीरसारखे वक्तव्य करतात. इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहात का? महिलांचा अपमान का करता? बदनाम का करता? महिलांचे चरित्र हणणं का करता? एकजण तर म्हणाला शिवाजी महाराज आग्र्यातून जसे सुटले तसे एकनाथ शिंदे तावडीतून सुटले.. कुणाच्या तावडीतून सुटले? सुरत, गुहाटी रेडा कापला. कोणताही विकासाचा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने थांबवला नाही.. परंतु यांनी थांबवले, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, एकजण तर म्हणाला अफजलखानानाने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला? आपण काय बोलतो? दिवसा चंद्रावर जातात का काय माहिती. आम्ही ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करत होतो. उसाचे टनेज घटले आहे. यांनी साखरेच्या बाबतीत कोटा पद्धत काढली. लोकांची कनेक्शन का कट करता? देवेंद्र फडणवीस म्हणतात की कनेक्शन कट करणार नाही. पण हे करतात ना? यांनाच कट करायची वेळ आली आहे. बोम्बाई म्हणतात हवं माझं ते माझं. महाराष्ट्र काय आंदण दिला का? ते म्हणतात ते हे माझं ते माझं. आपले मुख्यमंत्री का म्हणत नाहीत, हे माझं म्हणून? लोकांच्या मनात फुटून जाण्याची भावना आली याला जबाबदार कोण? 

कर्नाटकला आपले 2 मंत्री जाणार होते. परत तेच म्हणाले महापरिनिर्वाण दिन आहे. काही उचित प्रकार घडायला नको.. आधी कळलं नाही का महापरिनिर्वाण दिन आहे म्हणून. उगाच काहीतरी थापा मारता, असा टोला अजित पवार यांनी लगावला. आपले अनेक प्रकल्प दुसरीकडे गेले. देशात बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवर गेला आहे.. सगळं खापर मागच्या सरकारवर फोडतात. सहा महिने झालं मंत्री होऊन तरी काय झालं तरी ते म्हणतात मागच्या सरकारने केलं. काम करायचे सोडून जोतिष्याला हात दाखवून येतात..आधी नवस करायला जातात आणि परत नवस फेडायला जातात. रेडा कापायला जातात, असा टोलाही यावेळी अजित पवार यांनी लगावला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Ravindra Dhangekar:  भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
Devendra Fadnavis: इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 25 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सSanjay Ruat PC : न्यायालयावर राजकीय निर्णयांबाबत आम्हाला विश्वास राहिला नाहीBeed Santosh Deshmukh : संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांची नेमणूक करा, मस्साजोग ग्रामस्थ आक्रमकVaibhavi Deshmukh On Hunger Strike : वडिलांनी सहन केलेल्या वेदना खूप होत्या, हे आंदोलन काहीच नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
दहावीचं पुस्तक घेण्यासाठी लायब्ररीकडे निघाला, अज्ञात वाहनानं कट मारला अन्...; नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Ravindra Dhangekar:  भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
भाजपचे अनेक नेते पबचे पार्टनर, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकारणीच जबाबदार; रवींद्र धंगेकरांचा खळबजनक आरोप 
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
ठाकरे गटाला गळती सुरूच! भाजपने दिला मोठा धक्का, उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील बडा मोहरा गळाला लावला!
Devendra Fadnavis: इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
इंद्रजित सावंतांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी थेट कोल्हापूरच्या एसपींना फोन लावला अन्...
Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमावरून वादाची ठिणगी, त्र्यंबकेश्वर ट्रस्ट विरोधात माजी विश्वस्त आक्रमक; म्हणाल्या, चुकीचा पायंडा पाडू नका!
"क्लायमॅक्स... फक्त एक दृश्य नव्हतं, तो साक्षात्काराचा क्षण होता"; शंभूराजांचा सच्चा सहकारी साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्यानं सांगितल्या 'त्या' आठवणी
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Champions Trophy 2025 : भारताविरुद्ध पराभव, चॅम्पियन्स ट्रॉफीत निराशाजनक कामगिरी, पाकिस्तानच्या महत्त्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी करणार?
चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दोन पराभव, पाकिस्तानच्या जिव्हारी, स्पर्धेतून बाहेर होताच प्रमुख व्यक्तीची हकालपट्टी
Embed widget