एक्स्प्लोर

Vidhan Sabha Election : 'विधानसभेसाठी मला अनेक पक्षातून संपर्क, पण...'; अजित पवार गटाच्या अण्णा बनसोडेंचं ठरलं!

Anna Bansode : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे विधानसभेची निवडणूक कोणत्या चिन्हावर लढणार, याची चर्चा सुरु आहे. याबाबत अण्णा बनसोडे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

पुणे : मला अनेक पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे ही फोन येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election) कोणत्या चिन्हावर लढायची हे माझं ठरलेलं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Camp) आमदार अण्णा बनसोडेंनी (Anna Bansode) केले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  

लोकसभा निकालानंतर (Lok Sabha Election 2024) बनसोडे हे महायुतीतून विधानसभा लढणार नाहीत? अशी चर्चा रंगलेली आहे. भाजपने अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी देत पिंपरी विधानसभेतील बनसोडेंच्या वाटेतील काटा दूर केल्याची चर्चा आहे. त्यातच मला इतर पक्षातून संपर्क साधला जातोय, बड्या नेत्यांचे फोनही येतायेत. मात्र विधानसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढायची हे मी ठरवेन आणि माझं ठरलंय. मी अजितदादांचा कट्टर समर्थक असल्यानं मी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे, असं म्हणत बनसोडेंनी चर्चांना पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे.   

पिंपरी विधानसभेची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीलाच सुटणार

भाजपने अमित गोरखेंना विधान परिषदेची उमेदवारी देत पिंपरी विधानसभेतील बनसोडेंच्या वाटेतील काटा दूर झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत अण्णा बनसोडे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना, आरपीआयची युती आपण पाहत आहोत. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक असतात. पिंपरी विधानसभेतून अमित गोरखे हे भाजपकडून इच्छुक उमेदवार होते. त्यामुळे भाजपने त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी गेल्या दहा वर्षांपासून आमदार म्हणून काम करत आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटालाच सुटेल, असा माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

मी अजितदादांच्या राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढेल

गेल्या काही दिवसांपासून तुम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार? अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सर्वच पक्षांची दारं खुली असतील, असे विचारले असता अण्णा बनसोडे म्हणाले की, मी अजितदादांचा कट्टर समर्थक आहे. माझं ठरलं आहे की, कुठल्या पक्षातर्फे लढायचे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात काम करताना प्रत्येकाचे फोन मला येतात. मात्र जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईल. पण मला वाटते की, मी अजितदादांच्या राष्ट्रवादीतूनच निवडणूक लढेल, असे त्यांनी म्हटले. 

विलास लांडे माझे चांगले सहकारी

माजी आमदार विलास लांडे यांचे समर्थक शरद पवार गटाला जाऊन भेटून आले आहेत. त्यांच्याकडून तुम्हाला संपर्क साधला जात आहे का? अनेक बडे नेते शरद पवारांचे दार ठोठावता आहेत, असे विचारले असता अण्णा बनसोडे म्हणाले की, विलास लांडे माझे चांगले सहकारी आहेत. आमचा रोज संपर्क होतो. मात्र त्यांच्यासोबत अशी कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Video : बीडमध्ये सुस्साट बाईकवर रिल काढण्याचा नाद, क्षणात भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Poharadevi Narendra Modi Welcome Prepration : पंतप्रधान वाशिम दौऱ्यावर; सभास्थळी जोरदार तयारीAmravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्जTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaPM Narendra Modi Thane Daura : पंतप्रधान मोदींच्यादौऱ्यासाठी ठाण्यात रस्त्याचं डीप क्लिनिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद , उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
निवडणुकीआधी गुहागरमध्ये राजकीय शिमगा; आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली, भास्कर जाधवांनी विनय नातू यांचा विकृत माणूस म्हणून केला उल्लेख
Ajit Pawar: प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
प्रत्येकजण मरायला आलाय! सुनील शेळकेंचा भरसभेत मावळमधील स्पर्धकांना जाहीर इशारा, अजित पवार म्हणाले...
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
भाऊच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय, काँग्रेसनेते सचिन पायलट यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
Nandurbar News : भूकंपाच्या धक्क्यांनी नंदुरबार हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तीन दिवसांपासून रस्त्यावर काढावी लागतेय रात्र
भूकंपाच्या धक्क्यांनी नंदुरबार हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तीन दिवसांपासून रस्त्यावर काढावी लागतेय रात्र
NCP: अजितदादा गटातील नेत्याला मुंबईत टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, भुजबळांनी कट्टर समर्थक गमावला
अजितदादा गटातील नेत्याला मुंबईत टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं, भुजबळांनी कट्टर समर्थक गमावला
Embed widget