एक्स्प्लोर

Pune Supriya sule : सुप्रिया सुळेंनी चांदणी चौकातील पुलासाठी सुचवलं 'हे' नाव

पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे, या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सूचवलं आहे.

Pune Supriya sule : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. येत्या काळात या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या पुलासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव सुचवलं आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा 'मुळशी सत्याग्रह' केला. सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. ट्वीट करत त्यांनी ही मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्य़े काय लिहिलंय?

पुणे शहरातील चांदणी चौक येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर  उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी व अपघात यावर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र शासनाकडे यापुर्वी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यावर चांदणी चौकात पुलाचे काम नव्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार काम देखील सुरु आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे.  हा पूल मुळशी तालुका, पुणे शहर आणि परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यासोबतच तो पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे ठिकाण असणार आहे.

मुळशी तालुक्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच तालुक्यात थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी आणि भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा 'मुळशी सत्याग्रह' केला. या सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनांपैकी हे एक महत्त्वाचे आंदोलन अशी त्याची नोंद आहे. यानिमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणे शक्य आहे. यासाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांना विनंती आहे की कृपया आपण यासंदर्भात सकारात्मक विचार करुन यासंदर्भात निर्णय घ्यावा, असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. येत्या दो महिन्यात हे काम  पूर्ण होईल, असं सांगण्यात आलं आहे. या मार्गावरील काही पुल सुरु करण्यात आले आहेत. 1 मे रोजी या पुलाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. मात्र पुलाचं काम अपूरं असल्याने उद्घाटनाला विलंब होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
Embed widget