BJP Candidate List Of Maharashtra : मोठी बातमी : पुण्यातून मुरलीधर मोहोळ, सोलापुरातून अमर साबळे, भाजपची 32 उमेदवारांची सरप्राईज यादी
BJP Candidate List Of Maharashtra : भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर सोलापुरात भाजपकडून अमर साबळे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
BJP Candidate List Of Maharashtra : भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर सोलापुरात भाजपकडून अमर साबळे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या संभाव्य 32 उमेदवारांची यादी एबीपी माझ्याच्या हाती आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर जागा वाटपाबाबतच्या राजकीय हालचालींना वेग आलाय.
भाजप लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम
भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या 32 जागावर ठाम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेच्या किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान,अजित पवार आणि शिंदे गट भाजपने दावा केलेल्या जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, अमित शाह जागा वाटपाचा तिढा सोडवणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपची संभाव्य उमेदवार यादी
1. पुणे : मुरलीधर मोहोळ.
2. धुळे : सुभाष भांबरे यांच्या ऐवजी प्रदिप दिघावरकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता.
3. हिंगोली : हेमंत पाटील यांच्या जागेसाठी भाजपा आग्रही असून त्याठिकाणी भाजपा तानाजी मुरकुटे यांना मिळण्याची शक्यता.
4. जालना : रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता.
5. चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेला पाठवल जाण्याची शक्यता.
6. नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कायम ठेवले जाणार.
7. नंदूरबार : हिना गावित किंवा विजयकुमार गावीत.
8. अकोला : संजय धोत्रे
9. ईशान्य मुंबई : मनोज कोटक
10. सोलापूर : सिद्धेवर महाराज यांच्या ऐवजी अमर साबळे यांना मिळण्याची शक्यता.
11. कोल्हापूर : सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे मात्र भाजपा आग्रही आहे.
12. भंडारा-गोंदिया : सुनिल मेंढे
13. बीड : विद्यामन प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे.
14. माढा - रणजितसिंह निंबाळकर
15. गडचिरोली : अशोक नेते यांच्या ऐवजी राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम भाजपा चिन्हावर लढू शकतात.
16. भिवंडी : कपिल पाटील
17. सांगली : संजयकाका पाटील यांच्या ऐवजी काँग्रेस चे विशाल पाटील भाजपा पक्ष प्रवेश करून लढू शकतो.
18. सातारा : उदयनराजे भोसले
19. जळगाव : उन्मेष पाटील किंवा ए टे नाना पाटील.
20. दिंडोरी : भारती पवार
21. रावेर : अमोल जावळे
22. उस्मानाबाद : बसवराज पाटील (नुकताच बसवराज पाटील यांनी भाजपा पक्ष प्रवेश केलाय)
23. उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मिळण्याची शक्यता.
24. संभाजीनगर : विद्यामन मंत्री अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड.
25: उत्तर मध्य मुंबई : पुनम महाजन यांच्या ऐवजी आशिष शेलार यांना मिळण्याची शक्यता.
26. ठाणे : डॉ.संजीव नाईक यांना मिळण्याची शक्यता. (ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मात्र भाजपा घेण्यास आग्रही आहे )
27. रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे
28. दक्षिण मुंबई : राहूल नार्वेकर
29. नांदेड : मिनल खतगावकर
30 . राजेंद्र गावीत : सध्या राजेंद्र गावित शिंदे गटात आहेत. मात्र ते भाजपा पक्ष प्रवेश करून भाजपा तिकिटावर लढतील अशी शक्यता आहे.
31. अहमदनगर : सुजय विखे पाटील किंवा राम शिंदे, सध्या नगरमध्ये वाद सुरू आहे.
32. अमरावती : नवनीत राणा यांचा भाजपा पक्ष प्रवेश होईल. मात्र नवनीत राणा यांचा जातीच्या प्रमाणपत्रावरून वाद सुरू आहेत. या जागेवर आनंदराव अडसूळ हे देखील आग्रही आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या