एक्स्प्लोर

Shivneri Bus: आनंदाची बातमी! शिवनेरी बस उद्यापासून 'अटल' सेतूवरुन धावणार; प्रवासाचा किती वेळ वाचणार, तिकीट किती?

Mumbai Pune Bus Service: शिवनेरी बस उद्यापासून शिवडी-न्हावाशेवा सेतूवरुन धावणार, जाणून घ्या प्रवासाचा किती वेळ वाचणार, तिकीट किती? प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, तिकीटाचे दर वाढले की नाही?

मुंबई: शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या "अटल सेतू "वरून (Atal Setu) एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात आली असून प्रायोगिक तत्त्वावर उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी ६.३०) व  स्वारगेट- दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत. या बसेस पुणे (Mumbai Pune Bus) येथून निघून थेट पनवेल नाव्हाशेवा, शिवडी मार्गे मंत्रालय/दादर येथे पोहोचतील. परत ११ वाजता याचमार्गे अनुक्रमे मंत्रालय व दादर येथून निघतील. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे १ तास वाचणार आहे. तिकीट दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी प्रवाशांनी शिवनेरी बस (Shivneri Bus) फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या बस फेऱ्या अर्थात, एसटीच्या अधिकृत msrtc mobile reservation ॲप वर व www.msrtc.gov.in संकेतस्थळावर  आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे शिवनेरी बस अटल सेतूवरुन चालवण्यासंदर्भात चाचपणी सुरु होती. शिवनेरी बस मुंबईतून सुटताना त्यामध्ये ४५ प्रवाशी असतील तर बस अटल सेतूवरुन नेण्यात येईल, असा प्रस्ताव विचाराधीन होता. परंतु, आता प्रवाशी संख्येची कोणतीही अट न ठेवता आता दररोज सकाळी पुण्यावरुन मुंबईला दोन शिवनेरी बसेस रवाना होतील. मुंबईवरुन पुण्याला जाताना अटल सेतूचा वापर केला तर पनवेल एसटी स्थानक वगळावे लागणार आहे. पनवेलसह अन्य लहान-मोठे थांबेही घेता येणार नाहीत. त्यामुळे आता शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेण्याचा पर्याय कितपत यशस्वी ठरतो, हे पाहावे लागेल.

प्रवाशांचा किती वेळ वाचणार, बसचे तिकीट किती?

शिवडी- नाव्हाशेवा अटल सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांकडून 250 रुपये इतका टोल आकारला जातो. त्यामुळे या मार्गावरुन धावणाऱ्या शिवनेरी बसचे तिकीट वाढणार का, हा प्रश्न होता. परंतु, एसटी महामंडळाने अटल सेतूवरुन धावणाऱ्या शिवनेरी बसेससाठी तिकीट दरात कोणताही बदल केलेला नाही. अटल सेतूवरुन मुंबईतून निघालेली बस अवघ्या २० मिनिटांत सिग्नलमुक्त मार्गाने चिर्ले येथे पोहोचणे शक्य होणार आहे. चिर्लेहून 60 किमी अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आहे. अटल सेतूच्या मार्गाने  पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी भरते. याशिवाय, वाहतूक कोंडीची समस्या विचारात घेतल्यास शिवनेरी बस अटल सेतूवरुन नेल्यास प्रवासाचा वेळ साधारण तासाभराने कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा अनुभव आता आणखी सुखकारक होणार आहे.

आणखी वाचा

'शिवशाही' बसच्या दरात 'शिवनेरी'मधून प्रवास; राज्यात धावणार 'जन-शिवनेरी' बस

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget