एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसच्या प्रवासाचा वेळ 40 मिनिटांनी वाचणार
मुंबई ते पुणे 192 किलोमीटरचे अंतर आहे. सध्या इंटरसिटी एक्स्प्रेसला हे अंतर कापण्यासाठी 3 तास 17 मिनिटांचा कालावधी लागतो.
मुंबई : मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 31 मेपासून सात दिवसांसाठी नवीन वेळापत्रकानुसार इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार आहे. ज्यात ही गाडी 3 तास 17 मिनिटांऐवजी 2 तास 35 मिनिटांमध्ये पुणे गाठेल. त्यामुळे प्रवाशांचा जवळपास पाऊण तास त्यामुळे वाचणार आहे.
इंटरसिटी एक्स्प्रेसला पुश अॅण्ड पूलचे डबल इंजिन लावून चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे इंटरसिटी एक्स्प्रेस पुढील सात दिवसांसाठी नव्या वेळापत्रकानुसार धावेल. जर या सात दिवसात गाडी व्यवस्थित वेळापत्रकानुसार, इतर गाड्यांच्या वेळेला धक्का न लावता, प्रवाशांचा सोयीने धावली तर हेच वेळापत्रक कायम ठेवलं जाणार आहे.
मुंबई ते पुणे 192 किलोमीटरचे अंतर आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसला हे अंतर कापण्यासाठी 3 तास 17 मिनिटांचा कालावधी लागतो. कर्जत घाटात सेक्शन असल्यामुळे बॅंकर (मागे इंजिन) जोडणे आणि काढणे यासाठी अतिरिक्त वेळ लागतो. आता पुश-पुल इंजिनामुळे या गाडीला या प्रवासासाठी 2 तास 35 मिनिटे लागणार आहे. यामुळे इंटरसिटी एक्स्सतच्या वेळेत जवळपास 40मिनिटांची बचत होणार आहे.
कसं असेल नवं वेळापत्रक?
31 मेपासून सीएसएमटीवरुन 6.40 वाजता सुटणारी गाडी 6.45 वाजता सुटेल, तर पुण्यात 9.57 ऐवजी 9.20 वाजता पोहोचेल. तर पुण्याहून संध्याकाळी 5.55 वाजता सुटणारी गाडी 6.30 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 9.05 वाजता पोहोचेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement