एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पाच वाहनांचा विचित्र अपघात

पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आडोशी बोगद्याजवळ झालेल्या विचित्र अपघातामुळे सकाळपासूनच वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. पाच वाहनं एकमेकांवर धडकल्यानं महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक अखेर सुरळीत झाली आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर तीन ते चार किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेसातच्या दरम्यान आडोशी बोगद्याजदवळ दोन कार, दोन ट्रक आणि एक कंटेनर एकमेकांवर आदळले. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सलगच्या अपघातांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक धोक्याची होत आहे का, असा प्रश्न सामान्य प्रवाशांच्या मनात निर्माण झाला आहे.
आणखी वाचा























