एक्स्प्लोर
शंभर जणांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या 'त्या' दोघींना शोधा : कोर्ट
मुंबई : पुण्यात शंभर जणांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा दावा करणाऱ्या नेपाळी तरुणीसह दिल्लीच्या मॉडेलला शोधा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने पुणे पोलिसांना दिले आहेत. दिल्लीच्या 24 वर्षीय मॉडेलसह 16 वर्षीय नेपाळी तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचं सांगत वेश्याव्यवसायात जबरदस्ती ढकलल्याचा आरोप केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांसह शंभर जणांनी आपला लैंगिक छळ केल्याचा दावा नेपाळी तरुणीने केला आहे. 'हे आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे असून पीडितांच्या ठावठिकाण्याबाबत आपल्याला काळजी वाटते. त्यामुळे त्यांना शोधण्याचे गांभीर्याने प्रयत्न करा.' असं जस्टिस रणजित मोरे आणि रेवते डेरे यांच्या खंडपीठाने सांगितलं.
गेल्या सहा महिन्यांपासून दोन्ही पीडिता बेपत्ता असल्याने ही केस सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टात करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने पुणे पोलिसांना दोघींचा शोध घेण्याचे आदेश दिले. या प्रकरणी पोलिसांवर आरोप केलेले असल्यामुळे दोघींच्या जीवाचं बरं-वाईट झाल्याची भीतीही वकिलांनी व्यक्त केली.
या प्रकरणात ज्या दोघा पोलिसांवर आरोप आहेत, तेच कोर्टात प्रॉसिक्युटरला मार्गदर्शन करत असल्यामुळे कोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
काय आहे प्रकरण?
मार्च 2016 मध्ये दिल्लीच्या संबंधित मॉडेलला भाजल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी, रोहित भंडारी नावाच्या व्यक्तीने आपल्याला चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मात्र आपण नकार देताच सिगरेटचे चटके देऊन बलात्कार केला. त्यानंतर अनेक आरोपींनी आपल्यावर गँगरेप केल्याचा आरोप तिने केला होता.
रोहितच्या पुण्यातील फ्लॅटमध्ये मॉडेलची ओळख 16 वर्षीय नेपाळी तरुणीशी झाली. तिला ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने नेपाळहून पुण्याला आणण्यात आलं होतं. 2014 पासून दोन वर्ष अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरु, भोपाळमधील अनेक जणांनी रेप केल्याचं नेपाळी तरुणीने सांगितलं. त्यानंतर दोघींनी यशस्वीपणे दिल्लीला पलायन केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement