एक्स्प्लोर
Advertisement
... तर डीएस कुलकर्णींना कोणत्याही क्षणी अटक?
डीएसकेंनी तत्काळ 50 कोटी जमा न केल्यास त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
मुंबई: डीएसकेंनी तत्काळ 50 कोटी जमा न केल्यास त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 50 कोटी नेमकी कधी भरणार याविषयी हायकोर्टात सोमवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करणं डीएसकेंना अनिवार्य आहे.
गुंतवणूकदारांची थकितबाकी या पैशांमधून दिली चुकती केली जाणार आहे. नफ्यातील 25 टक्के रक्कम तत्काळ जमा करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. तसंच विकता येणाऱ्या संपत्तींची यादीही हायकोर्टानं डीएसकेंना सादर करण्याचे आदेश दिले होते.
हायकोर्टाकडून डीएसकेंना 1 तासाची मुदत!
मुंबई उच्च न्यायालायने बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना फटकारत, केवळ एक तासाची मुदत दिली आहे. बँकांकडे तारण ठेवलेल्या संपत्तीची यादी दाखवू नका, तात्काळ विकता येतील अशा संपत्तीची यादी तासाभरात सादर करा, असे आदेश हायकोर्टाने डीएसकेंना दिला.
डीएसकेंकडून सहा संपत्तींची यादी हायकोर्टात सादर कऱण्यात आली. यानंतर हायकोर्टाने डीएसकेंना फटकारलं.
हायकोर्टाला मोलभाव करण्याचा मंच समजू नका, गेल्या तीन सुनावणीत मुदत मागून तुम्ही केवळ न्यायालयाची दिशाभूल केली.
इतक्या वर्षात कमावलेला रोख नफा थकीत रकमेच्या २५% म्हणून तातडीनं जमा करा, असं हायकोर्टाने सुनावलं.
इतकंच नाही तर बँकांकडे तारण ठेवलेल्या संपत्तीची यादी दाखवू नका, तात्काळ विकता येतील अशा संपत्तीची यादी तासाभरात सादर करा, असे आदेश हायकोर्टाने डीएसकेंना देण्यात आले आहेत.
कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी
दरम्यान गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर डीएसकेंनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं.
“मी विजय मल्ल्यासारखे कोणाचे पैसे घेऊन पळून गेलेलो नाही. आम्ही कोणालाही फसवलं नाही. फसवणं वेगळं आणि वेळेत पैसे परत न करणं वेगळं. आम्ही सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देऊ”, असं आश्वासन बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांनी सांगितलं.
काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून बांधकाम उद्योगाला मंदी आली आहे. यामुळे गुंतवणुकदार गोत्यात आले आहेत. यामुळेच पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी एस कुलकर्णी अर्थात डीएसके आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले आहेत.
मध्यमवर्गीयांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळवून देणारा बिल्डर म्हणून डीएसकेंनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. पण आता गुंतवणुकदारांची अडचण झाली आहे. डीएसकेंकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्यानं लोक त्यांच्या कार्यालयांमध्ये चकरा मारत आहेत.
२०१४ पासून अनेकांनी घर बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. २०१४ पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.
स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. १९ डिसेंबर २०१४ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.
संबंधित बातम्या
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात
डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला
शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement