एक्स्प्लोर

Lungs Transplant : डॉक्टर ठरले देवदूत! फुफ्फुस घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा अपघात, डॉक्टर स्वत: जखमी पण चेन्नई गाठून केली शस्त्रक्रिया...

प्रत्यारोपणासाठी फुफ्फुस घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला. एका व्यक्तीला जीवदान द्यायचं असल्यानं जखमी डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवले आणि थेट कारने प्रवास सुरु केला.

पुणे : प्रत्यारोपणासाठी फुफ्फुस (Lungs Transplant) घेऊन निघालेल्या (Pune news) रुग्णवाहिकेचा टायर फुटून अपघात झाला. एका व्यक्तीला जीवदान द्यायचं असल्यानं जखमी डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवले आणि थेट कारने प्रवास सुरु केला. दोन तास उशीर झाला खरा, पण सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. अंगावर काटा आणणारी ही घटना पिंपरी चिंचवड ते चेन्नई या प्रवासादरम्यान घडली. 

नेमकं काय घडलं?

हृदय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर संजीव जाधव  स्वतः रुग्णवाहिकेत पुढं बसलेले होते. डॉ जाधवांनी पिंपरी चिंचवडच्या डॉ डी वाय पाटील रुग्णालयात एका दात्याची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर ते फुफ्फुस चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात न्यायचे होते. डॉ डी वाय पाटील रुग्णालय ते पुणे विमानतळ हा प्रवास रुग्णवाहिकेतून सुरू झाला. मात्र हॅरीस ब्रिजजवळ सायंकाळी पाचच्या सुमारास रुग्णवाहिकेचा टायर फुटला आणि चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला. रुग्णवाहिका दोन-तीन वाहनांना धडकली आणि शेवटी डिव्हायडरमध्ये रुग्णवाहिका अडकली. अन्यथा रुग्णवाहिका पुढं नदीत कोसळली असती.

स्वत: जखमी पण चेन्नई गाठून केली शस्त्रक्रिया...

रुग्णवाहिकेत ड्रायव्हर शेजारी बसलेले डॉक्टर जाधव, ज्युनिअर डॉक्टर आणि दोन टेक्निशियन जखमी झाले होते. मात्र धोका इथंच टळला नव्हता, पुढं फुफ्फुस चेन्नईला वेळेत पोहचवण्याचं आव्हान होतं. त्यामुळं दुसऱ्या रुग्णवाहिकेची वाट पाहता येणार नव्हती, मग जखमी अवस्थेत असलेल्या डॉक्टर जाधवांनी खासगी वाहन बोलावलं आणि त्यात फुफ्फुस घेऊन पुणे विमानतळपर्यंतचा प्रवास केला. तिथून विमानाने ते चेन्नईला पोहचले. सायंकाळी 6:30 वाजता पोहचण्याचं उद्धिष्ट होतं पण पोहचायला 8:30 झाले. त्यानंतर ही जखमी अवस्थेत असणाऱ्या डॉ. जाधवांनी त्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली.

या रुग्णाला फुफ्फुसाचा कर्करोग होता

शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून रुग्ण ाची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रिया करण्यात आलेला रुग्ण 72 दिवस लाईफ सपोर्टवर होता. त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग होता. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी होत आहे. डॉक्टरांचा स्वत:चा अपघात झाल्यानंतरही डॉक्टरांनी आपला धीर न सोडता परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आणि प्रसंगावधान दाखवून रुग्णाला जीवनदान दिलं आहे. त्यामुळे डॉक्टरांचं सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्यासोबतच रुग्णाच्या नातेवाईकांनीदेखील डॉक्टरांचे आभार मानले आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Dhirendra Shastri : धीरेंद्र शास्त्रींचं आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर थेट देहूत जात तुकाराम महाराजांचं दर्शन, पाहा फोटो...

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं
तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं
वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप, विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, रोहित पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल
वारकरी संप्रदायाविषयी चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप, विकास लवांडेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, रोहित पवार पोलिस स्टेशनमध्ये दाखल
Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak: पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात काय घडलं?
पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात काय घडलं?
Vikas Lawande : शाईफेक झालेल्या विकास लवांडेंना अटक, शाई फेकणारे संग्राम भंडारे मोकाट, चोर सोडून संन्यासीला फाशी, लवांडेंचं टीकास्त्र
शाईफेक झालेल्या विकास लवांडेंना अटक, शाई फेकणारे संग्राम भंडारे मोकाट, चोर सोडून संन्यासीला फाशी, लवांडेंचं टीकास्त्र

व्हिडीओ

Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive
Raj Thackeray Railway Bharti Andolan : रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता
NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या डॉ. मनोज शिरुरेला अटक
Amravati MLC Election : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक, पोटे तिसऱ्यांदा मैदानात?
Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Share Market : सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
सेन्सेक्स आणि निफ्टीत अखेरच्या टप्प्यात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले, बाजारात काय घडलं?
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
इराणचा तोंड दाबून बुक्क्यांचा मारा देताच नेत्यानाहू अन् ट्रम्पच्या जिगरी दोस्तीत कुस्ती लागली! एक तासाच्या फोनाफोनीत शाब्दिक चकमकीत काय घडलं? गेल्या 24 तासांतील 5 प्रमुख घडामोडी
Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
सत्तेत भाजप, प्रश्न त्यांनाच, सध्या उलटी लोकशाही सुरुय, मतदार सरकार निवडण्याऐवजी, सरकार ठरवतंय मतदान कोण करणार; 'काॅजप'च्या अभिजित दीपकेचा हल्लाबोल
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
लोकसभेला 9 जागांवर आलेल्या भाजपला महाराष्ट्रात विधानसभेला कोणती जादूची छडी मिळाली? ममता, स्टॅलिन, केजरीवाल कसे पराभूत झाले?? काॅकरोच जनता पार्टीच्या अभिजितकडून निवडणूक आयोगाच्या कारभाराची चिरफाड
Kriti Kharbanda: 'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
'ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है'! पंतप्रधानांच्या इटली दौऱ्यानंतर कृती खरबंदाची पोस्ट चर्चेत; ग्लॅमरस PHOTO' s ने चाहते घायाळ
Embed widget