एक्स्प्लोर

Moshi Building Collapse: मोशीच्या इमारतीत मध्यरात्री व्हायब्रेशन टेस्ट, कामगारांच्या हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी जवानांनी मोहीम राबवली अन्...

Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

Moshi Building Collapse: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोतील 'वेस्ट टू एनर्जी' (Waste-to-Energy) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ही इमारत तळमजल्यासह तीन मजली असून, यामध्ये तळमजल्यावर पार्किंग (Parking), पहिल्या मजल्यावर कॅन्टीन (Canteen) आणि दुसऱ्या मजल्यावर कॉन्फरन्स रूम (Conference Room) आहे. दुर्घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये 23 कामगार (Workers) होते, त्यापैकी दुसऱ्या मजल्यावरील 5 कामगार तातडीने बाहेर पडले होते. तर सायंकाळी 6 आणि मध्यरात्री 3 वाजेपर्यंत एकूण 9 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

Moshi Building Collapse: मध्यरात्री 2 वाजता 'साउंड व्हायब्रेशन टेस्ट'

या बचावकार्यादरम्यान मध्यरात्री जवानांकडून एक अत्यंत महत्त्वाची 'साउंड व्हायब्रेशन टेस्ट' (Sound Vibration Test) करण्यात आली. ढिगाऱ्याखाली आणि कोसळलेल्या स्लॅबच्या खाली अडकलेल्या कामगारांच्या हृदयाचे ठोके (Heartbeats) सुरू आहेत का, हे तपासण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला. मात्र, दुर्दैवाने या चाचणीदरम्यान आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे.

Moshi Building Collapse: भिंतीला होल पाडून जवानांचा कॅन्टीनमध्ये प्रवेश

प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुढचे सलग सहा तास जेसीबी (JCB) आणि पोकलेन मशीनच्या साहाय्याने इमारतीच्या बाजूला साचलेले कचऱ्याचे अवाढव्य ढीग हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यानंतर आज सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास जवानांनी पहिल्या मजल्याच्या भिंतीला मोठे छिद्र (Hole) पाडले. या छिद्रातून 9 ते 10 जवानांनी थेट कॅन्टीनमध्ये प्रवेश केला आहे.

Moshi Building Collapse: आता कॅन्टीन अन् पार्किंगमध्ये शोधमोहीम

अनेक कामगार पहिल्या मजल्यावरील कॅन्टीनमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी कॅन्टीनमध्ये आणि त्यानंतर तळमजल्यावरील पार्किंगच्या वाहनांमध्ये कोणी अडकले आहे का? याची शोध मोहीम राबवली जात आहे. अद्यापही आतमध्ये 8 ते 9 कामगार अडकल्याची तीव्र भीती व्यक्त केली जात असून, जवानांकडून शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. 

Moshi Building Collapse:  सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचा आमचा शर्थीचा प्रयत्न: गिरीश महाजन

दरम्यान, या भीषण घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली आणि ते स्वतः रात्रभर तिथेच तळ ठोकून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. गिरीश महाजन एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. जास्त पाऊस पडल्याने कचरा डेपोचे पाणी इमारतीमध्ये आल्याने इमारत पडली. अत्यंत कमी कालावधीत 600 मिमी इतका प्रचंड पाऊस पडला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. तीन लोकांना आतमध्ये जाऊन चहा आणि बिस्किटे दिली आहेत. मात्र, दुर्दैवाने त्यांना सध्या बाहेर काढता येत नाहीये. त्यांचे पाय पिलरखाली अडकलेले आहेत. ते दिसत असूनसुद्धा त्यांना बाहेर काढता येत नाहीये. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्याचा आमचा शर्थीचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली. 

Moshi Building Collapse: मोशी इमारत दुर्घटनेत महापालिकेकडून नियमांची पायमल्ली  

- वेस्ट एनर्जी प्रकल्पाचे कार्यालय आणि कचऱ्याचा ढीग यात किती अंतर होतं?

- सुरक्षा भिंत होती का? असेल तर कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उंची पाहता सुरक्षा भिंत किती फूट उंचीची होती?

- कार्यालय आणि कॅन्टीन इतर सुरक्षित जागेवर उभारता आलं असतं का?

- दुर्घटनेनंतर इमारतीत किती कामगार अडकले, या आकडेवारीचा घोळ?

- मुख्य अभियंता संजय कुलकर्णींनी 16 कामगार, पालिका आयुक्त विजय सुर्यवंशीनी 20 कामगार अन मग मंत्री गिरीश महाजनांनी 23 कामगार अडकल्याची माहिती दिली.

- स्वतःच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या एका इमारतीत किती जण असतील? हे पालिकेला माहीत नसणे, ही बाब गंभीर आहे.

- त्यामुळं मूळ आकडा लपवण्याचा हेतू तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जातीये.

आणखी वाचा 

Girish Mahajan on Moshi Building Collapse: तीन जणांचे पाय पिलरखाली अडकलेत, ते समोर दिसतायत, पण...; गिरीश महाजनांनी सांगितली मोशी दुर्घटनेची डोळ्यात पाणी आणणारी परिस्थिती!

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख, अमृता फडणवीस म्हणाल्या, काँग्रेसने माफी मागायला पाहिजे
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार द्यावा, आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget