एक्स्प्लोर

TET Exam : टीईटी परीक्षा घोटाळा: पुणे पोलिसांकडून आणखी एकाला अटक; लखनऊमध्ये केली कारवाई

TET Exam Scam : पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसानी लखनऊमधून एकाला अटक केली आहे. सौरभ त्रिपाठी असे आरोपीचे नाव आहे.

TET Exam Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई सुरूच आहे. पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी नावाच्या व्यक्तीला लखनऊमधून अटक केली आहे.  सौरभ त्रिपाठीची  'विनर' नावाची कंपनी आहे. या कंपनीने 2017 साली शिक्षण परिषदेचे परीक्षा घेण्याचे कंत्राट जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीला मिळवून देण्यासाठी लायझनिंगचे काम केले होते. 

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी आणखी काही जणांना टप्प्याटप्प्याने अटक होणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी दिली होती. त्यानंतर आता लखनऊमधून सौरभ त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेसाठीचे कंत्राट वर्ष  2017 ते 2020 पर्यंत जी. ए. टेक्नॉलॉजीकडे होते.  त्यानंतर मागील वर्षी हे कंत्राट सौरभ त्रिपाठीच्याच विनर कंपनीला देण्यात आले आहे. 

पुणे पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विनकुमार यांना अटक केली असल्याची माहिती दिली होती. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जी.ए. टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते. 

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात इतर परीक्षांमध्येही घोटाळे झाले असल्याचे समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी याचा तपास सुरू केला. 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात डेरे हा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. टीईटीची 15 जुलै 2018 रोजी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 12 ऑक्टोबर 2018 रोजी जाहीर झाला. पैसे घेतलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकेतील ओएमआर रिकामे सोडण्यास सांगितले जायचे. उत्तरपक्षिका स्कॅन करताना या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका भरल्या जायच्या अथवा त्यांना गुण दिले जायचे. या आरोपींनी निकालात घोटाळा करताना खोटी प्रमाणपत्रे दिली असल्याचे समोर आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिली. 

भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यालाही अटक 

बीडमधील भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी संजय सानप यालाही पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणी अटक केली आहे. भाजप कार्यकर्ता संजय सानप हा आरोग्य भरतीचा पेपर फोडण्यात सहभागी होता.  एवढंच नाही तर त्याने वडझीरे गावातील मंगल कार्यालयात आरोग्य  पैसै देणाऱ्या उमेदवारांना बोलावून त्यांच्याकडून फोडलेला हा पेपर लिहून घेतला होता. सानप हा प्रशांत बडगीरेच्या अतिशय जवळचा होता.  त्यातूनच त्याला 31 ऑक्टोबरला झालेला आरोग्य भरतीचा पेपर आधीच मिळाला होता आणि परिक्षेच्या काही दिवस आधीच त्याने हा पेपर वडझीरे गावातील मंगल कार्यालयांमध्ये हा पेपर लिहून घेतला होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Someshwar Karkhana Election : दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
दादांच्या नंतर 'सोमेश्वर'वर वहिनींची सत्ता, बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या जगतापांचा पराभव, राष्ट्रवादीची एकतर्फी सत्ता
Vivekanand Patil and Navnath Ban: भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
भारतीय संविधान वाचलेली पोरं जिंकलेली आहेत, फडणवीसांचे आभार मानत विवेकानंद पाटलांची प्रतिक्रिया
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget