Marathwada Flood : वढू गावातील सख्ख्या मैत्रिणींचा दिलदारपणा; पुरामुळे खचलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आजीबाईंनी गायी दान केल्या
Marathwada Flood : मराठवाड्यातील विदारक चित्र आपण रोज पाहतोय. संसार उद्ध्वस्त झाले. शेतीच्या शेती वाहून गेली आणि यात मराठवाड्याला पुन्हा आहे तसं उभं करण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्न करत आहे.

Marathwada Flood : शेतकऱ्यांचं दु:ख शेतकरीच समजू शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याजवळील छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ असलेल्या वढू (Vadhu village) गावातील या दोन आजी...कांताबाई शिंदे आणि संगीता शिवले..या दोघींनीही मराठवाड्यातील परिस्थिती पाहून आपल्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या गायी दान देण्याचा निर्णय घेतलाय. युवा स्पंदन संस्थेतर्फे मदतीचा हात मागितला होता. त्यानंतर या दोन मैत्रिणींनी गायी दान देऊन शेतकऱ्याची मदत करण्याचा निर्णय घेतलाय. कांताबाई शिंदे यांच्या गायीचं नाव लक्ष्मी आणि संगीता शिवले यांच्या गायीचं नाव दुर्गा आहे. आता लक्ष्मी अन् दुर्गा मराठवाड्यातील शेतकऱ्याकडे संस्थेतर्फे सुपूर्त केल्या जाणार आहेत. आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गरज आहे... त्यांना आपल्याकडे असलेलं काहीतरी देऊन मदत केली पाहिजे, अशा भावना दोघींनी व्यक्त केली आहे.(two old lady donated cows)
Marathwada Flood : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गायी दान करण्याचा निर्णय
मराठवाड्यातील विदारक चित्र आपण रोज पाहतोय. संसार उद्ध्वस्त झाले. शेतीच्या शेती वाहून गेली आणि यात मराठवाड्याला पुन्हा आहे तसं उभं करण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्न करत आहे. त्यात मराठवाड्याला मदत करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या वढू गावातील दोन सख्या मैत्रिणी सरसावल्या आहेत. त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना गायी दान करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या या निर्णयाचं गावकऱ्यांकडून कौतुक होतंय. कांताबाई शिंदे आणि संगीता शिवले असं या दोन मैत्रिणींचं नाव आहे. कांताबाई शिंदे यांच्या गायीचं नाव लक्ष्मी आणि संगीता शिवले यांच्या गायीचं नाव दुर्गा आहे.
Marathwada Flood : आपली जनावरं किती महत्वाची असतात मला माहिती
'माझ्या घरात एकेकाळी पाणी शिरलं त्यावेळी मी संसार न बघता थेट जनावरं छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीजवळ नेऊन बांधली होती, आपली जनावरं किती महत्वाची असतात मला माहित आहे. त्यात मराठवाड्याच्या बातम्या टीव्हीवर बघते. त्यामुळे मी एवढे वर्ष लेकराप्रमाणं सांभाळलेली माझी लक्ष्मी नावाची गाय मराठवाड्यातील शेतकऱ्याला दान करतेय', असं वढू गावातील आजी कांताबाई शिंदे म्हणाल्या तर वर्षभर कमावलेलं मराठवाड्यातील शेतकऱ्याने काही दिवसांच्या पावसात गमावलंय. आज आमच्याकडे देण्यासाठी पैसा आडका नाही पण माझ्याकडे असलेल्या चार गायींपैकी एक गाय मी त्यांना देणारे कारण प्रत्येक संकटात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. त्यात शेतकऱ्याचं दु:ख आमच्यापेक्षा कोण समजून घेईल. मला माझ्या दुर्गा गायीची आठवण येईल. पण गाय गरजू शेतकऱ्याकडे जाणार आहे. त्यामुळे तो चांगलीच काळजी घेईल याची खात्री असल्याचं संगिता म्हणाल्या.
Marathwada Flood : लेकराप्रमाणे सांभाळलेल्या गायी या मराठवाड्यातील गरजू शेतकऱ्यांना द्यायच्या
कांताबाई शिंदे आणि संगीता शिवले या दोघी मैत्रिणी लग्न होऊन संभाजी महाराजांच्या समाधी असलेल्या वढू गावात आल्या. त्यांची मैत्री वाढली आणि काही वर्षांनी बहिणींसारख्याच राहायला लागल्या. गावात दोघींचीही घरं पाच मिनिटांच्या अंतरावर आहेत. रोज सकाळी कामं आटपायची गोठ्यातील सगळी कामं उरकायची. जनावरांची कामं करायची आणि थेट शेत गाठायचं, असा दोघींचाही दिन क्रम. शेतात फार काही पिक नाही पण दोघींचं मन आभाळाएवढं मोठंय. आपण आपल्या लेकराप्रमाणे सांभाळलेल्या गायी या मराठवाड्यातील गरजू शेतकऱ्यांना द्यायच्या आणि त्यांना आपल्या तुटपुंज्या कमाईतून का होईना पण मदत करण्याचा निर्णय घेतलाय.
Marathwada Flood : युवा स्पंदन संस्था गायी गरजू शेतकऱ्यांकडे सूपूर्त करणार
हे सगळं जुळून आलं सोशल मीडियावरील युवा स्पंदन संस्थेच्या एका सोशल मीडियाच्या पोस्टवरुन. युवा स्पंदन संस्थेने मराठवाड्याला मदतीसाठी पुढे या आम्ही तुमची मदत पोचती करु अशी सोशल मीडियावर पोस्ट केली. ही पोस्ट शिंदे आजीच्या नातवाने पाहिली आणि आजीला दाखवली. रोज आजीला मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं विदारक चित्राचे व्हिडीओ आजीला दाखवत होता आणि आता मदतीची पोस्टदेखील दाखवली आणि आजीने थेट नातवाला सांगितलं की देऊन टाक आपली गाय... असं सांगितल्यावर नातवाने युवा स्पंदनच्या संस्थेतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि आता या दोन्ही गाय ही संस्था गरजू शेतकऱ्यांकडे सूपूर्त करणार आहेत
























