एक्स्प्लोर

Maratha Reservation : बारामतीत अजित पवारांच्या कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढलं

Ajit Pawar Baramati News : बारामती तालुक्यातील सोमेश्वर या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. 

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पुन्हा एकदा मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर या ठिकाणी अजित पवार एका कार्यक्रमाला आले असताना त्या ठिकाणी मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करताना मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) निर्णय झालाच पाहिजे असंही कार्यकर्त्यांनी म्हटलं. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. 

त्या आधी माढ्यात झालेल्या सभेच्यावेळीही अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत असून ठिकठिकाणी मराठा आंदोलक आंदोलन करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगामाला आल्यानंतर शुभारंभ झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी जात असताना मराठा समाजाच्या युवकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी या कार्यकर्त्याना सभेच्या ठिकाणाहून समजूत काढत बाहेर काढले आहे.

दरम्यान, रविवारी बारामती तालुक्यातील पणदरे या ठिकाणी पवार यांचा नागरिक सत्कार ठेवण्यात आला होता. या ठिकाणी देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना घेराव घालून तुमची भूमिका काय असा सवाल उपस्थित केला होता. सोमवारी माढा तालुक्यातील पिंपळणेर याठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला गेल्यानंतर त्या ठिकाणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. यामुळे मराठा समाज  आरक्षणाच्या मुद्दावरुन आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत .

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक 

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवर, चंद्रकांत पाटील यासह विविध नेत्यांचे फोटो पुतळ्यावर आहेत. दसऱ्याच्या दिवशी ज्या पद्धतीने रावणाचे दहन केले जाते तसे आम्ही 11 मुखी सर्वपक्षीय नेत्यांचा पुतळा दहन केलाय अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली. 

राज्यात मराठा आरक्षणावरून तरुण आत्महत्या करत आहेत, मात्र राजकीय नेते शक्तिप्रदर्शन करत दसरा मेळाव्या घेण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा आणि दहन केला आहे. तरुणांनी आत्महत्या करू नये, गनिमी कावा पद्धतीने रस्त्यावर उतरून लढा उभरावा अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समवन्वयक राम जाधव यांनी दिली. 

ही बातमी वाचा: 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Pune Crime News: कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
कंबरदुखीमुळे जवळ येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने पत्नीवर केला जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget