एक्स्प्लोर

Manoj Jarange Mumbai March : मनोज जरांगेंची यात्रा पुण्यात धडकणार; पाहा कोणते रस्ते सुरु, कोणते बंद?

मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange)   यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा पुण्यात धडकणार आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.

पुणे : मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange)   यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला आहे. आज चंदन नगर (खराडी बायपास) पुणे येथे हा मोर्चा निघणार आहे. उद्या म्हणजे 24 जानेवारीला (बुधवारी) हा मोर्चा पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पोहोचणार आहे. ही मिरवणूक राजीव गांधी पूल, जगताप डेअरी चौक, डांगे चौक, बिर्ला हॉस्पिटल चाफेकर चौक, अहिंसा चौक, महावीर चौक, खंडोबा माळ चौक, टिळक चौक, भक्ती शक्ती, हॉटेल पुणे गेट गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, देहूरोड आणि तळेगाव अशा विविध ठिकाणांहून मुंबईच्या दिशेने जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अखत्यारित 24 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक सुधारणा राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार हे बदल करण्यात आले आहेत.

24जानेवारी रोजी सकाळी 6 वाजल्यापासून मोर्चा पुणे ग्रामीण भागात येईपर्यंत सर्व वाहनांची वाहतूक (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) तात्पुरती बंद राहणार आहे. पर्यायी मार्गावरील वाहनचालकांना मार्गदर्शन करून वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी त्यानुसार नियोजन करून या काळात सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

कोणते रस्ते बंद कोणते सुरु?

1.औंध डीमार्ट ते सांगवी फाटा :
- सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी. या मार्गावरील वाहनांनी पोल चौकातून डावीकडे वळून नागराज रोडमार्गे आपल्या गंतव्यस्थानी जावे.

2.पिंपळे निलख ते रक्षक चौक :
- पिंपळे निलख येथून येणाऱ्या वाहनांनी रक्षक चौकात न जाता विशाल नगर डीपी रोडमार्गे जगताप चौक - कस्पटे चौक मार्गाने जावे.

3. जगताप डेअरी पुलाखालील चौक :
- कसपटे चौकातील वाहने जगताप डेअरी चौकाखालील ग्रेड सेपरेटरद्वारे शिवार चौक, कोकणे चौक येथून थेट आपल्या गंतव्यस्थानी पोहोचावीत. औंध रावेत रोडने डाव्या व उजव्या बाजूने जाणे टाळावे.

4. शिवार चौक वाहतूक :
- शिवार चौकातून होणारी वाहतूक औंध रावेत बीआरटीएस रोडकडे उजवीकडे व डावीकडे वळू नये. त्याऐवजी कस्पटे चौकातून थेट ग्रेड सेपरेटरमधून इच्छित स्थळी जावे.

5.तापकीर चौक, एमएम चौक ते काळेवाडी फाटा पूल :
- सर्व वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहनांनी रहाटणी फाटा चौकातून रहाटणी गाव - गोडांबे चौकमार्गे आपल्या गंतव्यस्थानी जावे.

6.सांगवी ते सांगवी फाटा :
- सांगवी ते सांगवी फाटा या मार्गावरील वाहनांनी शितोळे पंप - जुनी सांगवी व वसंतदादा पुतळा चौक - जुनी सांगवी - दापोडी मार्गे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचावे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : भररस्त्यात तरुणीची छेडछाड, मदतीला आलेल्या तरुणांना लाकडी दांडक्याने मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल

व्हिडीओ

Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
Eknath Shinde Urban Development : नगरविकास विभागाकडून सायनचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या गळाला? आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचा पलटवार
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून भाजप आमदाराला धमकी; अधिवेशनाला पोहोचताच बघून घेतो म्हणत फोन कॉल
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली; सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
'एकट्या कोचला टार्गेट करू नका, माझ्यासोबतही असं झालं होतं'! गौतम गंभीर यांच्या मदतीला चक्क विरोधक धावला; गुरुजींना सुचक इशाराही दिला
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
मोठी बातमी! बार्शी बाजार समितीवर भाजपच्या राऊत गटाचे वर्चस्व; सत्ता कायम राखत सोपल-बारबोले गटाला 'दे धक्का'
PM Modi on Vande Mataram: फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती, वंदे मातरम शंभर वर्षाचे झाले तेव्हा देशभक्तांना जेलमध्ये टाकलं, संविधानाची गळचेपी झाली : पीएम मोदी
Embed widget