(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुफान आलंया! कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगेंचा रात्रभर प्रवास, पहाटे 4 वाजता लोकांकडून सत्कार, मुंबईच्या दिशेने कूच
Manoj Jarange Mumbai March : कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगे (Manoj Jarange) नावाचं वादळ थांबलेलं नाही. बुधवारी मध्यरात्री जरांगेची पायी दिंडी पुण्यात धडकली होती. त्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत झालं. मनोज जरांगे रात्रीही थांबले नाहीत.
Manoj Jarange Patil News : पुण्यामध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे, 10 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान घसरलेले आहे. इतक्या कडाक्याच्या थंडीतही मनोज जरांगे (Manoj Jarange) नावाचं वादळ थांबलेलं नाही. बुधवारी मध्यरात्री जरांगेची पायी दिंडी पुण्यात धडकली होती. त्यानंतर ठिकठिकाणी त्यांचं स्वागत झालं. मनोज जरांगे रात्रीही थांबले नाहीत. 26 जानेवारी रोजी मुंबईत पोहचण्याचा (Manoj Jarange Mumbai March) त्यांचा निर्धार आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) नावाचं तुफान निघालं आहे. त्यांचं प्रत्येक ठिकाणी जंगी स्वागत होत आहे. पुण्यात आज पहाटेही लोक त्यांच्या स्वागतासाठी थांबले होते. महिला, पुरुष आणि तरुण मंडळीचं प्रमाण मोठ्या प्रमणात होतं. काही ठिकाणी पहाटे जेसीबीच्या मदतीने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. सध्या मनोज जरांगे यांचं हे वादळ लोणावळ्यात आलेय. येथे विश्रांती घेतल्यानंतर सभा होणार आहे. उपस्थितीतांना संबोधित केल्यानंतर हे वादळ मुंबईच्या दिशेने कूच करेल.
पहाटे चार वाजता जरांगेच्या स्वागतासाठी गर्दी -
मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणाच्या मागणीसाठीची पायी दिंडी पुण्यातील वाघोली परिसरातून बुधवारी सकाळी नऊ वाजता सुरू झाली. चंदननगर, येरवडा, शिवाजीनगर, औंध असा प्रवास करत जरांगेंचा मोर्चा रात्रीचे पावणेचार वाजलेले असताना डांगे चौकात पोहोचला. पुढे बिर्ला हाँस्पीटल, चाफेकर चौक, भक्ती शक्ती चौक असा प्रवास केला. जागोजागी चौकाचौकात समर्थक स्वागतासाठी उभे होते. गर्दी प्रचंड झालेली. रात्रीच्या कडाक्याच्या थंडीतही लहान मुले, तरुण, वयोवृद्ध सर्व वयोगटातील लोक जरांगेंच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उभे आहेत.
जरांगेच्या स्वगतासाठी तासंतास वाट पाहिली -
पुण्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. जागोजागी मनोज जरांगे यांचं स्वागत होत असल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ त्यांना लागत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना तासंतास वाट पाहावी लागत आहे. थंडी जास्त असल्यामुळे जागोजागी शेकोटी पेटवण्यात आलेली. मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. भल्या पहाटेही लोकांनी मोठी गर्दी केली होती. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी जागोजागी शेकोटी पेटवली. मराठा बांधव जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर तासंतास बसून होते.
पहाटे जेसीबीतून पुष्पवृष्टी -
पिंपरी चिंचवडमध्ये पहाटे साडेचार वाजता मराठा बांधवांनी जेसीबी लावून मनोज पाटील यांच्यावर फुल उधळली, फटाके वाजवून त्यांचं जंगी स्वागत केलं.. पहाटे साडेचार वाजता आहे मोठ्या संख्येने मराठा बांधव मनोज जडगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले. यामध्ये महिलांचाही सहभाग मोठा.
पहाटेही चहा-पाण्याची सोय -
देहूरोड या ठिकाणी देखील मराठा बांधव मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना पाण्याची सेवा करत आहेत. पहाटे साडेपाच वाजता या मोर्चात सहभागी झालेले लोकांना चहा पाजला जातोय.अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय.
आणखी वाचा :