एक्स्प्लोर

Sahyadri Hospital: पश्चिम महाराष्ट्रात मोठी बिझनेस डील, सह्याद्री ग्रूप आता मणिपाल ग्रुपच्या ताब्यात; इतक्या कोटींमध्ये सौदा झाला, राधिका आपटेशी आहे कनेक्शन

Sahyadri Hospital: कॅनडाच्या या कंपनीने 2022 मध्ये अडीच हजार कोटी रुपये मोजून सह्याद्री हॉस्पिटल्सचा एव्हरस्टोन या कंपनीकडून मिळवला होता.

पुणे: पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात हॉस्पिटल्सची साखळी असलेला सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपकडे जाणार आहे. मणिपाल हेल्थ एन्टरप्रायजेस कंपनीने तब्बल सहा हजार चारशे कोटी रुपयांची बोली लावून सह्याद्री हॉस्पिटलाचा ताबा मिळवला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि कराड या ठिकाणी मिळून सह्याद्री ग्रुपची अकरा हॉस्पिटल्स आहेत. ज्यामध्ये तेराशे बेड्स, अडीच हजार आरोग्य कर्मचारी आणि साडेतीन हजार सपोर्ट स्टाफ काम करतो. सह्याद्री हॉस्पिटल्सच्या साखळीचा ताबा आतापर्यंत कॅनडाच्या ऑंटीरिओ टीचर्स पेन्शन प्लॅन या कंपनीकडे होता. कॅनडाच्या या कंपनीने 2022 मध्ये अडीच हजार कोटी रुपये मोजून सह्याद्री हॉस्पिटल्सचा एव्हरस्टोन या कंपनीकडून मिळवला होता.

 तीन वर्षांनी सहा हजार चारशे कोटींना सह्याद्री हॉस्पिटलाचा ताबा मणिपालकडे देताना कॅनडाच्या या कंपनीला दुपटीहून अधिक परतावा मिळणार आहे. 2019 ला सह्याद्री हॉस्पिटलची स्थापना करणाऱ्या डॉक्टर चारुदत्त आपटे यांच्याकडील हॉस्पिटल्सचा ताबा एक हजार कोटी रुपये मोजून एव्हरस्टोन कंपनीने मिळवला होता. यातून आरोग्य क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा प्रभाव किती वेगाने वाढतोय हे दिसून येतं आहे. मणिपाल हॉस्पिटल हा भारतातील दुसरा मोठा आरोग्य क्षेत्रातील समूह असून देशाच्या विविध शहरांमध्ये मिळून या समूहाची बारा हजार बेड्स आहेत. सह्याद्री हॉस्पिटलल्सची नोंदणी धर्मादाय हॉस्पिटल्स म्हणून असली तरी खाजगी कंपन्यांकडे ताबा गेल्याने 2019 पासून धर्मादाय आयुक्तालयाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करणं हॉस्पिटलससाठी बंधनकारक राहत नाही. सामान्य नागरिकांना मात्र यामुळं आरोग्यसेवा आणखी महाग होण्याची भीती आहे.

मणिपाल हेल्थ एन्टरप्रायजेस कंपनीने तब्बल सहा हजार चारशे कोटी रुपयांची बोली लावून सह्याद्री हॉस्पिटलाचा ताबा मिळवला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि कराड या ठिकाणी मिळून सह्याद्री ग्रुपची अकरा हॉस्पिटल्स आहेत. ज्यामध्ये तेराशे बेड्स, अडीच हजार आरोग्य कर्मचारी आणि साडेतीन हजार सपोर्ट स्टाफ काम करतो. सह्याद्री हॉस्पिटल्स ही महाराष्ट्रातील अग्रगण्य खासगी रुग्णालय साखळी असून, पुणे, नाशिक, कराड, कोल्हापूर यांसारख्या शहरांमध्ये हॉस्पिटल्स आहे. OTPP या कॅनडास्थित निधी संस्थेने 2019 मध्ये सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये गुंतवणूक केली होती. चार वर्षांनंतर त्यांनी आपला हिस्सा मणिपाल समूहाला विकला आहे. 

राधिका आपटेशी आहे कनेक्शन

2019 ला सह्याद्री हॉस्पिटलची स्थापना करणाऱ्या डॉक्टर चारुदत्त आपटे राधिका आपटेचे वडील आहेत. राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी झाला आणि तिचं बालपण पुण्यात गेलं. त्यांचे वडील डॉ. चारुदत्त आपटे हे एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray PC : फक्त याद्यांमध्ये गोंधळ नाही तर अनेक ठिकाणी घोळ, आदित्य ठाकरेंचा आरोप
Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
Embed widget