एक्स्प्लोर

Pune News: दुर्दैवी! इमारत बांधकामाच्या बाजूच्या दुकानाची कोसळली भिंत; एकाचा मृत्यू

पुण्यात इमारतीच्या बांधकामाच्या जागेला लागून असलेल्या दुकानाची भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पुण्यातील गणेश पेठेतील हमजेखान चौकात घडली.

Pune News: पुण्यात इमारतीच्या बांधकामाच्या जागेला लागून असलेल्या दुकानाची भिंत कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज पुण्यातील गणेश पेठेतील हमजेखान चौकात घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी व्यक्तीला बाहेर काढले होते. अडकलेला व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गंभीर जखमी असल्याने काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

गेले तीन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी लहान-मोठे अपघात होत आहेत. आतापर्यंत किमान 40 झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे अपघात होत आहे. त्यातच गणेश पेठेत भिंत पडल्याने खळबळ उडाली आहे. गणेश पेठे हा पुण्यातील जुना परिसर आहे. या परिसरात अनेक ठिकाणी घराला-घरे लागून आहेत. त्यामुळे इमारत बांधत असलेल्या ठिकाणी जर मशीनीने काम सुरु असेल तर त्याचे हादरे परिसरातील बाकी जुने वाडे किंवा दुकांनांना बसतात. त्यामुळे अशा घटना घडतात. मात्र इमारत बांधणारे सगळे मजूर सुरक्षित आहेत.  

पुण्यातील नाना पेठेतील मॉर्डन बेकरीसमोर एका दुमजली वाड्यातील घराची भिंत कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. अडकलेल्या रहिवाशांची अग्निशमन दलाच्या  जवानांनी सुखरुप सुटका केली आहे. त्याचबरोबर सोमवार पेठेतील बोळे वाडा येथे पहिल्या मजल्यावरील घराचा काही भाग कोसळला आहे. दोन्ही अपघातात कोणतीही सुदैवाने जीवित हानी झाली नाही आहे.

साधारण साडे-सातच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कंट्रोलरुम मध्ये जीना कोसळल्याचा फोन आला. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले. पुण्यतीसल जुने वाडे जीर्ण झाले आहेत. त्यामुळे हे वाडे धोकादायक झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यापुर्वी हे वाडे सोडा, अशा प्रकारच्या नोटीसा पुणे महानगरपालिकेने नागरिकांना बजावल्या होत्या त्यानंतर पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध भागातील 38 हून अधिक अतिधोकादायक वाडे पाडण्यात आले आहेत. एक-दोन नाहीतर तब्बल 478 वाडे धोकादायक असल्याचं निदर्शनास आल्यावर पालिकेने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. 

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती
Sharad Pawar : इकडे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय उडवून लावला, तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत बोलावलं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
इकडे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय उडवून लावला, तिकडे पंतप्रधान मोदींना बारामतीत बोलावलं, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Sharad Pawar on NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य, थेट उडवूनच लावलं, म्हणाले....
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं महत्त्वाचं भाष्य, थेट उडवूनच लावलं, म्हणाले....

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Embed widget