उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत, काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? चंद्रराव तावरेंचा अजितदादांना करडा सवाल
Malegaon Cooperative Sugar Factory Election: उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली असा थेट सवाल तावरे यांनी विचारला आहे.

Malegaon Cooperative Sugar Factory Election: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट शड्डू ठोकल्यानंतर चांगेलच शाब्दिक युद्ध रंगलं आहे. माळेगाव साखरकारखाना निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नीळकंठेश्वर, ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या पक्षाचा बळिराजा सहकार बचाव, चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती व अपक्षांचा एक पॅनेल, असे चार पॅनेल या निवडणुकीच्या रिंगणात आहे. दरम्यान, चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांच्यावर सडकून प्रहार करताना यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? अशी विचारणा केली आहे.
मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत
उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत यांनी काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली असा थेट सवाल चंद्रराव तावरे यांनी विचारला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोपांच्या फेरी झडू लागलेल्या आहेत. अजित पवार यांनी काल प्रचार सभेत तावरे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर तावरे यांनी आज अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवारांना जर लोकांचं कल्याण करायचं होतं तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून का केलं नाही? अजित पवारांचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांना ते दर का देत नाहीत? असा सवाल चंद्रराव तावरे यांनी विचारला.
मी चांगलं काम करेन की 85 वर्षांचा चांगले काम करेल?
दुसरीकडे, बारामतीचा चेअरमन मीच असेल तर साखर आयुक्त काय करेल, सहकार मंत्री काय करेल? मी चेअरमन झालो तर योग्य पद्धतीने कामगारांचे प्रश्न मार्गी लावेल. डायरेक्टर चुकला तर मी आहे, मी काय करायचं ते करतो, असे म्हणत अजित पवार यांनी आपल्याच पॅनेलला निवडून देण्याचं आवाहन केल. अजित पवारला पैशाची गरज नाही, बाप जाद्याच्या कृपेने बर चाललं आहे, मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगलं काम करेन की 85 वर्षांचा चांगले काम करेल? असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित केला. कारखाना निवडणुकीतील विरोधक असलेल्या 85 वर्षे वयाच्या चंद्रराव तावरे यांना अजित पवारांनी टोला लगावला.
यापूर्वी शरद पवारांच्या वयाच्या मुद्दाही अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपस्थित केला होता. माळेगाव नगर पंचायतीसाठी गेल्या चार वर्षात 350 कोटी दिले. एक्ससाईज डिपार्टमेंट कोण? अजित पवार आहे, त्याच्याच हातात आहे. त्याला विनंती करू, अरे सगळं आपल्या हातात आहे. सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तुम्हाला अजित पवारची मान खाली घालायची की ताट ठेवायची तुमच्या हातात आहे, असे म्हणत अजित पवारांनी माळेगाव सहकारी कारखान्यात पॅनेलला विजयी करण्याचं आवाहन केलं.
इतर महत्वाच्या बातम्या























