एक्स्प्लोर

Weather Update: छत्र्या, रेनकोट तयार ठेवा! पुणे जिल्ह्यात पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

maharashtra weather update: आज (शनिवारी) राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान वर्तविला आहे.

पुणे: राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांत आज शनिवारी (दि. 28) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा (Pune Rain Update) अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उद्यापासून (रविवारपासून) राज्यात कोरडे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे 30 डिसेंबरपासून पुन्हा थंडीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. आज (शनिवारी) राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान वर्तविला आहे. (Rain Update) 

हवामान विभागाने काल (शुक्रवारी) पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पुण्यात पावसाने हजेरी लावली नाही. हवेमध्ये काही प्रमाणात गारवा होता. शनिवारी देखील पुण्यात दुपारनंतर हलक्या स्वरूपात सरी कोसळण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. (Rain Update) 

शुक्रवारप्रमाणेच आजही (शनिवारीही) आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रविवारपासून मात्र संपूर्ण आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी विरळ धुके पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी थंडीची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज (शनिवारी) मात्र कमाल तापमान स्थिर राहणार असून, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता  आहे.  (Rain Update) 

पुण्यात शनिवारी किमान तापमानात चार अंशांनी वाढ होऊन ते 19 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. शनिवारी कोकणात हवामान कोरडे राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. राज्यातही थंडी गायब झाली आहे. (Rain Update) 

हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना यलो अलर्ट

जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, गोंदिया, नागपूर, जालना, बीड, भंडारा, चंद्रपूर,

धुक्यामुळं 30 फुटांवरील व्यक्तीही दिसेना

अकोल्यात तब्बल 2 तास दाट धुके पाहायला मिळाले. धुक्यामुळं 30 फुटांवरील व्यक्तीही दिसेना झाला होता. अकोला शहरावर आज सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. पहाटे 6 वाजेपासून धुके दाटले. ते सकाळी 9 वाजले तरीही धुके कायम आहेत. दाट धुक्यामुळे काही अंतरावर दिसणेही अवघड झाले. काल सकाळी अकोल्यात पावसाने हजेरी लावली होती. तर आज सकाळी अकोल्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली दिसली. काल पासून अकोल्यात पावसाळी वातावरण आहे. मात्र, पहाटेपासून सर्वत्र धुके पडले असल्याने रस्त्यावरील व्यक्तीही दिसत नव्हते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक कराTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP MajhaSambhaji Raje on Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा ; संभाजीराजेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Embed widget