Smruti Irani Visit Pune : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या असताना महिला काँग्रेसच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. स्मृती इराणी हॉटेल वर पोहचण्या आधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. महागाईच्या मुद्द्यावरुन
काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न
स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर आल्या असताना इराणी यांना भेटण्यासाठी महिला काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आला, तसेच त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिलांनी यावेळी केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना रोखलं, यावेळी त्यांच्यात झटापट झाल्याचं देखील दिसून आलं. यानंतर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यातील चतुर्शिंगी पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
वाढत्या महागाईमुळे निषेध
वाढत्या महागाईमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून स्मृती इराणी यांचा निषेध होत आहे. आज दुपारी पुण्यात पोहचल्यानंतर साडे पाच वाजता त्या बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवानंद द्विवेदी लिखित अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तक प्रकाशन सोहळयाला उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
स्मृती इराणींच्या हॉटेलबाहेर महागाई विरोधात आंदोलन
पुण्यात आल्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ज्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्या हॉटेलच्या बाहेर साडे चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या
फेकमफाक करू नका! औरंगाबादच्या नामांतरावरुन खैरेंचं फडणवीसांना 'सेना स्टाईल' उत्तर
Raj Thackeray : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले, म्हणाले...
Sharad Pawar: शरद पवारांवरील विखारी टीकेमागे भाजप-संघाचं पाठबळ; राष्ट्रवादीचा आरोप
Kishori Pednekar : केतकी चितळेच्या आजाराबाबत सगळ्यांनाच माहिती, यामागे कर्ता-करविता वेगळाच! किशोरी पेडणेकरांचा आरोप कोणावर?