Ketaki Chitale News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता संत तुकाराम महाराज संस्थानने देखील केतकीवर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांकडे विश्वस्तांनी तसा तक्रारी अर्ज दिलाय. केतकीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात जी कविता फेसबुकवर पोस्ट केली, त्यात 'तुका म्हणे' असा उल्लेख करण्यात आलाय. 'तुका म्हणे' या शब्दांचा उल्लेख करून, वादग्रस्त आणि विडंबनात्मक लेखन करण्यात आलंय. 'तुका म्हणे' ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून, महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. तेव्हा कोणत्याच संताचा वापर अशा पद्धतीने केला गेला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळं पुढं अशी कोणीच चुक करू नये म्हणून केतकी चितळेवर गुन्हा दाखल करावा. असा तक्रारी अर्ज संत तुकाराम महाराज संस्थानने करत कायदेशीर कारवाईची मागणी केलीय आहे.


 केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी


 केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. सकाळी केतकी हिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी कस्टडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली.  गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे कोर्टात हजर झालेले आहेत. केतकीने कोर्टात सांगितलं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं. 


केतकीवर आतापर्यंत राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.  


शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं


शरद पवारांवर टीका करणं केतकी चितळेला भोवलं आहे.  केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं विकृती, सर्वपक्षीयांकडून केतकी चितळेच्या पोस्टचा निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्रमक भूमfका घेण्यात आली आहे. दरम्यान केतकी चितळेच्या आक्षेपार्ह पोस्टवर शरद पवारांनी मी केतकीला मी ओळखत नसल्याचे काल म्हटलं. सर्व स्तरांतून केतकीच्या पोस्टचा विरोध केला जात असून राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी केतकीची चूक असल्याचं म्हटलं आहे.



संबंधित बातम्या :


Raj Thackeray : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट; राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावले, म्हणाले...


Ketaki Chitale : केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन