एक्स्प्लोर

गणेशने कुस्ती जिंकलीच, चंद्रहारच्या पाया पडून मनंही जिंकली!

कुस्तीतील हीच खिलाडूवृत्ती आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतही पाहायला मिळाली.

पुणे: बलदंड शरीरं,  झटापट, धोबीपछाड, आदळ-आपट आणि डावपेच असे सर्व प्रकार एकाच खेळात पाहायला मिळतात, तो खेळ म्हणजे कुस्ती. एकमेकांविरोधात त्वेषाने लढून, समोरच्या पैलवानाला चीतपट करण्याचा प्रयत्न प्रत्येक मल्लाकडून होत असतो. मात्र याच कुस्तीने एक अनोखंपण जपलं आहे. ते म्हणजे कुस्तीतील खिलाडूवृत्ती आणि वरिष्ठ खेळाडूला दिलेला सन्मान. कुस्तीतील हीच खिलाडूवृत्ती आज महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतही पाहायला मिळाली. वयाच्या पस्तीशीत पोहोचलेला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरला. चंद्रहारच्या खजिन्यात 2007 आणि 2008 सालच्या महाराष्ट्र केसरीची गदा आहे. त्यानंतर कामगिरीतला चढउतार आणि बळावलेली दुखापत यामुळं चंद्रहारला महाराष्ट्र केसरी जिंकता आला नाही. Chandrahar Patil & Ganesh Jagtap 1 गेल्या अनेक वर्षांपासून दुखापतींमुळे कुस्तीच्या आखाड्यातून दूर असलेला चंद्रहार महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरला. मात्र पहिल्याच फेरीत चंद्रहारला खूपच ज्युनिअर असलेल्या हिंगोलीच्या गणेश जगतापने चीतपट केलं. क्रिकेटसारख्या खेळात मोठ्या फलंदाजाची विकेट घेतल्यानंतर, नवखे गोलंदाज कसा आनंद साजरा करतात, हे आपण पाहिलं आहे. तसंच कुस्तीत चंद्रहारसारख्या बलाढ्य पैलवानाला चीतपट केल्यानंतर, कोणत्याही ज्युनिअर मल्लाने जल्लोष साजरा केला असता. मात्र कुस्ती हा खेळच वेगळा आहे. विजेता पैलवान गणेश जगताप सामना जिंकल्या जिंकल्या, थेट चंद्रहार पाटीलच्या पाया पडला. चंद्रहार हा डबल महाराष्ट्र केसरी विजेता आहे. कुस्ती या खेळासाठी त्याच्यासारख्या पैलवानांचं योगदान मोठं आहे. या खेळासाठी आणि वरिष्ठ खेळाडूचा मान राखण्यासाठी गणेश जगतापने थेट चंद्रहारचे आशीर्वाद घेतले. गणेश जगतापने स्वत: पराभूत केलेल्या पैलवानेचे आशीर्वाद घेतल्याने, उपस्थित शौकिनांनी त्याचं कौतुक केलं. गणेशने कुस्ती तर जिंकलीच, शिवाय मनंही जिंकली.

महत्त्वाच्या बातम्या

तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
तेजस्वी सातपुतेंची बदली भोंदू खरातच्या माध्यमातून झाली, चाकणकरांच्या सांगण्यावरून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Pune Crime News: पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यातील भोरमध्ये थरार, पोलीस पाटलांना निर्घृणपणे संपवलं, डोक्यावर धारदार शस्त्राने वार अन्..., नेमकं काय घडलं?
Rohit Pawar and Satyajeet Tambe: आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं
आपण सर्वजण एकाच पिढीतील राजकारणी, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांना सुनावलं

व्हिडीओ

Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Eknath Shinde: रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
रोहित पवारांच्या 'मफलर मॅन' आरोपावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; अमित शाहांवरील टीकेनंतर उद्धव ठाकरेंवरही पलटवार
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
ब्लु-टूथ, इस्त्रीमध्ये लपवून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावरुन 2 कोटी 26 लाखांच सोनं जप्त, दोघांना अटक
Pune Crime Daund: आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
आईचा विनयभंग केल्याच्या रागातून तरुणाला संपवलं, दोघांना अटक, दौंड हादरलं!
Mumbai Local Crime News: अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
अंधेरी रेल्वे स्थानकातील भयंकर व्हिडीओ समोर, लोकल ट्रेन चालू होताच शिवा गायकवाडने फेकलेला चाकू सुरेश शर्मांच्या छातीत घुसला
Embed widget