एक्स्प्लोर

पुणे विभागातील म्हाडाच्या 3139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी सोडत

यासाठी आजपासून (रविवार) नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे.

पुणे : म्हाडातर्फे पुणे विभागातील 3 हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांसाठी 30 जूनला सोडत निघणार आहे. यासाठी आजपासून (रविवार) नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीत असलेले अर्जदाराचे सरासरी उत्पन्न 25 हजारांपर्यंत असण्याची अट आहे. आयटी इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी आणि सिंहगड रोडला 30 जूनला संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज कसा कराल? पुणे विभागातील विविध वसाहतीतील तीन हजार 139 सदनिका आणि 29 भूखंडांच्या विक्रीसाठी https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर अर्जदारांच्या नोंदणीला आजपासून सुरुवात झाली. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 20 मे 2018 म्हणजेच आज दुपारी दोन वाजल्यापासून सुरुवात होत आहे, 18 जून 2018 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत नोंदणी करता येणार आहे. आय. टी. इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे येथे 30 जून 2018 रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी पुणे मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT/RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. NEFT/RTGS द्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी 20 मे 2018 दुपारी दोन वाजल्यापासून 19 जून 2018 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत कालावधी आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम स्वीकारली जाणार आहे. गटनिहाय मर्यादा अत्यल्प उत्पन्न गट यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी एक एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबीक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) 25 हजार रुपयांपर्यंत असणं गरजेचं आहे. अल्प उत्पन्न आणि उच्च उत्पन्न गट अल्प उत्पन्न गटासाठी 25 हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंत आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 50 हजार रुपये ते 75 हजार रुपयांपर्यंत तर, उच्च उत्पन्न गटासाठी अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबीक उत्पन्न 75 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासाठी गटनिहाय रक्कम ऑनलाईन अर्जासोबत भरायची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटासाठी 5 हजार 448 प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटासाठी 10 हजार 448 प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटासाठी 15 हजार 448 प्रति अर्ज, उच्च उत्पन्न गटासाठी 20 हजार 448 प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज 448 (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे. गटनिहाय सदनिकांची संख्या यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी सेक्टर 5 ए-ब, नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे) आणि महाळुंगे टप्पा-1 (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण 449 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी  महाळुंगे टप्पा-2 (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर), मोरेवाडी (कोल्हापूर), बार्शी (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), तळेगांव दाभाडे (पुणे), सदर बाजार (सातारा), सासवड(ता. पुरंदर, जि. पुणे), दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे), हडपसर (पुणे), रावेत (पुणे), नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे), चिखली -मोशी (पुणे), पिंपरी (पुणे), चिखली, चऱ्होली बु., कात्रज, धानोरी, आळंदी रोड, वाकड, येवलेवाडी (ता. हवेली, जि. पुणे),मौजे वडमुखवाडी, शिवाजी नगर (सोलापूर), डुडुळगाव  येथील दोन हजार 404 सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सुभाष नगर (कोल्हापूर), सासवड, खराडी, शिवाजीनगर (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), पिंपरी, महाळुंगे टप्पा-1 (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण 282 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. उच्च उत्पन्न गटासाठी पिंपरी (पुणे) येथील एकूण चार सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. 29 भूखंडांसाठी सोडत अल्प उत्पन्न गटासाठी क्षेत्र माहुली (जि. सातारा) बार्शी (जि. सोलापूर), भोर (जि. पुणे), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), बनवडी (ता. कराड, जि. सातारा), शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा), अक्कलकोट (जि. सोलापूर),  वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी बार्शी (जि. सोलापूर), क्षेत्र माहुली (जि. सातारा), दहिवडी (ता. माण, जि. सातारा) तर उच्च उत्पन्न गटासाठी  वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा)  येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे. दरम्यान, सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेलं नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करु नये. तसे केल्यास पुणे मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
Embed widget