एक्स्प्लोर
Advertisement
खंडाळा घाटातील दरड हटवली, पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक सुरु
दरड हटवल्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.
पिंपरी चिंचवड : खंडाळा घाटात शनिवारी रात्री कोसळलेली दरड मध्यरात्री हटवण्यात आली. त्यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर रात्री नऊ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर लगेचच दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईच्या दिशेने येणारी म्हणजेच अप मार्गावरील दरड हटवण्यात यश आलं असून मिडल लाईनवरील दरड हटवण्यात येत आहे. दरड कोसळल्यामुळे कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस खंडाळा स्थानकातच खोळंबली होती.
दुसरीकडे, रक्षाबंधनानिमित्त मुंबईतील तिन्ही लोकल रेल्वेमार्गावरी मेगाब्लॉक न रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सणाच्या निमित्ताने अनेक जण प्रवास करतात, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेगाब्लॉक घेतला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement