पुणे : पुण्यातल्या ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालवणाऱ्या (Sasoon Hospital Drug Racket) ललित पाटील बाबत रोज नव्याने गोष्टी समोर येत आहे. सासूनचे डीन संजीव ठाकूर यांनीच ललित पाटीलवर उपचार केल्याचं समोर आलं. मात्र हर्निया या आजारासाठी खरंच इतके दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात का? हा आजार नेमकं कसा असतो? यात काय त्रास होतो? आणि जर इतके दिवस रुग्णालयात राहावं लागत नाही तर मग ससूनचे डीन यांची फुस असल्यानेच ललित पाटील इतके दिवस रुग्णालयात राहिला का? असा प्रश्न उपस्थित होतो. पण हर्निया हा आजार 24 तासात बरा होतो. जास्तीत जास्त 4 ते पाच दिवस आराम करावा लागतो. 6 महिने ठेवायची गरज नाही, असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनरल सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार यांनी सांगितलं आहे. 


ललित पाटीलचा चार महिने मुक्काम ससूनमध्ये होता वेगवेगळ्या आजारांची कारणं देत ललित ससूनमध्ये तळ ठोकून होता.तातडीने हर्नियाचं ऑपरेशन करायचं असल्याचं सांगण्यात आलं होतं.त्याच्यावर हर्नियाचे उपचार सुरु असल्याचंदेखील सांगितलं गेलं. मात्र हर्नियावर उपचार करण्यासाठी चार महिने लागत नाही, असं या डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे ललित पाटीलवर बोगस उपचार सुरु होते का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


हर्निया म्हणजे काय?


आपल्या शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येतो.जो नंतर त्वचेखाली जागा व्यापतो. पोटातील कमजोर स्नायूंमुळे निर्माण झालेल्या पोकळीत आतडी ओढली जातात त्याला हर्निया दोष म्हणतात. हर्निया कोणालाही होऊ शकतो. आमच्यापैकी दहा जणांच्या आकडेवारीनुसार आपल्या आयुष्यात कधीही हर्निया आढळू शकतो. कोणत्याही वयात येऊ शकतो आणि कधीकधी अर्भक जन्माला येतात त्या वेळी पण आढळू शकतो. हा आजार पुरुषांमध्ये सामान्य आहे. 25 टक्के पुरुषांना हा हर्नियाचा त्रास होतो. पण हर्निया हा 24 तासात बरा होतो. 


दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनरल सर्जन डॉ. राजेंद्र गुंडावार यांनी सांगितलं की, मी एका चहा वाल्याचं ऑपरेशन केलं होतं, त्याने सकाळी टपरी उघडली, दुपारी आला ऑपरेशन केलं आणि संध्याकाळी पुन्हा त्याचा व्यवसाय केला. इतकं पटकन होणारं ऑपरेशन आहे. ड्रग्स किंवा सिगारेट ओढणाऱ्या लोकांना आयुष्यात कधीतरी हर्निया होतोच.


हर्नियाचे पाच प्रकार


हॅर्निया हा आजार पाच प्रकारचा असतो. या पाचही प्रकारात फारसा फरक नाही आहे. मात्र सगळ्या प्रकरात पुरुषाला वेदना होत असतात.इन्गुइनल हॅर्निया,फेमोरल हर्निया, उंबिलिकॅल हॅर्निया,इपिजिस्ट्रिक हर्निया, इंचिसिओनल हॅर्निया हे हर्नियाचे पाच प्रकार आहे. सगळ्यात हर्नियावर उपचार लवकर होतात. 


Lalit Patil Drug Case :संजीव ठाकूरने कैद्यांच्या नोंदीचं रजिस्टर गायब केलं, ललित पाटीलवर बोगस उपचार; तातडीचं ऑपरेशन सांगितल्यावर 10 दिवस पळत कसा होता?, आमदार रविंद्र धंगेकरांचा सवाल