Ladke Daji Yojana: लाडकी बहीण योजनेला जोरदार फाईट, पुण्यात लाडके दाजी योजना, हॉटेलच्या बिलावर 1500 रु. सूट
Ladke Daji Yojna: लाडकी सून योजना, लाडका भाऊ योजना, लाडका जावई योजना अशा अनेक मजेशीर योजना सुरू व्हाव्या अशा मागणी राज्यभरातून केली जात होती. अशातच पुण्यात आता पुण्याचे लाडके दाजी योजना सुरू करण्यात आली आहे.
Ladke Daji Yojana: राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) जोरदार चर्चा सुरू आहे. ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठी मदत असणार आहे, तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी फक्त काही महिन्यांसाठी सुरू केलेली योजना आहे, असं म्हणत विरोधकांनी टीका केली आहे. राज्यातील काही महिलांना या योजनेचा पहिला हप्ता नुकताच खात्यात जमा करण्यात आला आहे. आज या योजनेच्या वितरणाचा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. तर या योजनेनंतर लाडकी सून योजना, लाडका भाऊ योजना, लाडका जावई योजना अशा अनेक मजेशीर योजना सुरू व्हाव्या अशा मागणी राज्यभरातून केली जात होती. अशातच पुण्यात आता पुण्याचे लाडके दाजी योजना (Ladke Daji Yojana) सुरू करण्यात आली आहे.
पुण्यातील राया बिर्याणी या हॉटेलने पुण्याचे लाडके दाजी योजना (Ladke Daji Yojana) सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत लाडक्या दाजीला बिलावर दर महिन्याला 1500/- चे अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत लाडक्या दाजींनी लाडक्या बहिणीला शक्यतो आठवड्यातून एकदा जेवायला न्यावं लागणार आहे. या योजनेच्या बाबतीत काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. ही योजना फक्त सदाशिव पेठ येथील राया बिर्याणी येथेच घेता येणार आहे.
पुण्यात लाडकी बहीण नंतर आता लाडके दाजी योजना सुरू#Pune #Ladkedajiyojna #punenews pic.twitter.com/emMd0CozH6
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) August 17, 2024
पुण्याचे लाडके दाजी योजनेच्या अंतर्गत काय असणार?
लाडक्या दाजीला बिलावर दर महिन्याला 1500/- चे अनुदान मिळणार आहे.
या योजनेसाठीतच्या नियम व अटी :
1) लाडक्या दाजींनी लाडक्या बहिणीला शक्यतो आठवड्यातून एकदा जेवायला आणावे.
2) लाडक्या दाजीने मैत्रिणी सोबत येऊ नये. अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही.
3) दाजी बाहेर "पार्टी" करून येऊ शकतात. इतर लाड आपल्याकडे नाहीत.
4) युती, आघाडी, वंचित, मनसे या सर्व पक्षीय दाजींसाठी देखील ही योजना चालू आहे.
5) ही ऑफर फक्त राया बिर्याणी, सदाशिव पेठ येथेच आहे. दुसऱ्या हॉटेलात जाऊन भांडू नये.
माझी लाडकी बहीण योजना काय आहे?
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना (Chief Minister Ladki Bahin Yojana) असं या योजनेचं नाव आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. ज्या कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.